Nagpur Corona | धोका वाढला! सहा महिन्यांनंतर रुग्णसंख्येचा उच्चांक; नागपुरात आढळले 44 नवे कोरोना बाधित

| Updated on: Dec 29, 2021 | 9:57 AM

12 टक्के कोरोनाबाधितांमध्ये डोकेदुखी आढळून आली. 50 टक्के लोकांना श्‍वसनाचा तर 21 टक्के लोकांना अंगदुखीने ग्रासले होते. 17 टक्के कोरोनाबाधितांची भूक मंदावली होती.

Nagpur Corona | धोका वाढला! सहा महिन्यांनंतर रुग्णसंख्येचा उच्चांक; नागपुरात आढळले 44 नवे कोरोना बाधित
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेले कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. नागपूर जिल्ह्यात मंगळवारी 44 बाधित आढळले. गेल्या सहा महिन्यांतील हा उच्चांक आहे. त्यामुळं तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे.

कोरोनापश्‍चात रुग्णांच्या समस्या वाढल्या

कोरोनातून सावरल्यानंतर यापूर्वी बाधित असलेल्या रुग्णांच्या आता समस्या वाढल्या आहेत. ओपीडीमध्ये 452 रुग्णांची नियमित तपासणी करीत आहे. यातील 137 रुग्णांना लंग्स फायब्रोसीस झाल्याचे दिसून येत आहे. हे रुग्ण कोरोनाबाधित झाल्यानंत रुग्णालयात दाखल होते, यातील काहींना व्हेंटिलेटरचीही गरज पडली होती. तर 314 रुग्ण असे आहेत, ज्यांच्यामध्ये बहुतांशी वृद्ध रुग्णांमध्ये कोरोनापश्‍चात भीतीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. याशिवाय छातीत दुखणे, कोरडा खोकला, दम लागणे, भूक न लागणे, डोके दुखी, थकवा या समस्या अधिक जाणवत असल्याचे डॉ. अरबट यांनी सांगितले.

 

50 टक्के लोकांना श्वसनाने ग्रासले

क्रिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक अरबट यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाने 1763 कोरोनाबाधित रुग्णांचा अभ्यास केला. पहिल्या लाटेत रुग्णांना घशात खवखवीमुळे श्‍वसनाचे तर दुसर्‍या लाटेत न्यूमोनियाने मृत्यूचा टक्का वाढला. मात्र दुसर्‍या लाटेच्या तुलनेत पहिल्या लाटेमध्ये मृत्यूचा टक्का अधिक राहीला. पहिल्या लाटेत 8.2 तर दुसर्‍या लाटेत 6.8 टक्के मृत्यू झाले. पहिल्या लाटेत 75.2 टक्के तर दुसर्‍या लाटेत 88.5 कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची गरज पडली होती. सर्वाधिक 59 टक्के कोरोनाबाधितांमध्ये अशक्तपणा आढळला. तर खोकला असलेल्या बाधिताचे प्रमाण 55 टक्के होते. 49 टक्के बाधितांना ताप होता. तर 12 टक्के कोरोनाबाधितांमध्ये डोकेदुखी आढळून आली. 50 टक्के लोकांना श्‍वसनाचा तर 21 टक्के लोकांना अंगदुखीने ग्रासले होते. 17 टक्के कोरोनाबाधितांची भूक मंदावली होती.

 

15 टक्के रुग्णांमध्ये फुफ्फुसाची हानी

दोन्ही लाटांमध्ये बाधित आढळून आलेल्यांपैकी महिलांचे प्रमाण हे पुरुषांच्या तुलनेत जवळपास निम्मे राहिले. दोन्ही लाटेदरम्यान 66.6 टक्के पुरुषांना कोरोनाची बाधा झाली होती. तर 33.5 टक्के महिलाच बाधित झाल्या असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे. तसेच एकूण कोरोनाच्या रुग्णांपैकी 25 टक्के रुग्णांना सीटी स्कॅनची गरज पडली नाही. उर्वरित 33 टक्के रुग्णांमध्ये सौम्य, 27 टक्के रुग्णांमध्ये मध्यम तर 15 टक्के रुग्णांमध्ये तीव्र स्वरुपाची फुफ्फुसांची हानी झाल्याचे कोरोनाचे विदारक वास्तव पुढे आले.

 

ओमिक्रॉन संशयितांची संख्या वाढली

नागपुरात दुबई रिटर्न असलेल्या पाच तरुणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळं ओमिक्रॉन संशयितांची संख्या वाढली आहे. सर्वांना कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनची तर बाधा झालेली नाही ना? याची तपासणी करण्यासाठी त्यांचे नमुने पुण्याचा राष्ट्रीय विषाणऊ प्रयोगशाळेकडे जनुकिय चाचणीसाठी पाठवण्यात आले. शहरातील मानेवाडा परिसरातील 19 वर्षीय तरुण, मोतीबाग येथील 18 वर्षीय तरुण, कामठी येथील 31 वर्षीय तरुण, गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील 28 वर्षीय तरुण तसेच ब्रम्हपूरी येथील 36 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. हे पाचही जण दुबईतील शारजा येथून थेट विमानाने नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचले.

Pench Tiger | गंभीर जखमी अवस्थेत फिरत होती वाघीण; मृत्यू कशामुळं झाला असेल यावर चर्चा?

NMC Election | नागपूर मनपा निवडणूक मेपर्यंत पुढे जाणार? ओबीसी आरक्षणाशिवाय नकोत पदाधिकाऱ्यांना निवडणुका

Two murders | नागपुरात एकाच दिवशी दोन खून! दुपारच्या रागाचा रात्री बदला; दारु पिण्याच्या वादातून खून