उद्घाटनाचपूर्वीच कोराडीतील महामार्ग सुरू, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हटविले बॅरिकेट्स, उड्डाणपूल तयार होऊन झाला होता महिना

लोकांनी उद्घाटनाची वाट न पाहताच या मार्गाचा वापर सुरू केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरून ये-जा सुरू करण्यासाठी बॅरिकेट्स हटविले.

उद्घाटनाचपूर्वीच कोराडीतील महामार्ग सुरू, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हटविले बॅरिकेट्स, उड्डाणपूल तयार होऊन झाला होता महिना
उद्घाटनाची प्रतीक्षा न पाहता सुरू करण्यात आलेला कोराडी मंदिराजवळील उड्डाणपूल.
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 12:01 PM

नागपूर : नागपूर – ओबेदुल्लागंज महामार्ग गेल्या महिन्यापासून बनून तयार आहे. विधान परिषद निवडणुकीमुळं जिल्ह्यात आचारसंहिता लागली आहे. त्यामुळं सध्या उद्घाटन करता येत नाही. लोकांनी उद्घाटनाची वाट न पाहताच या मार्गाचा वापर सुरू केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी उड्डाणपुलावरून ये-जा सुरू करण्यासाठी बॅरिकेट्स हटविले.
2015 मध्ये उड्डाणपूल नांदाजवळ बनविण्यात येणार होता. परंतु, 2018 च्या शेवटी कोराडी मंदिराजवळ उड्डाणपूल बनविण्याची निश्चित झाले. या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यानं लोकांना बराच त्रास व्हायचा. चक्कर मारून जावे लागत होते.

जनतेनेच घेतला पुढाकार

उड्डाणपुलाचे काम सुरू असल्यानं वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. गेल्या महिन्याभरापूर्वी या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले. परंतु, उद्घाटन झाले नसल्यानं वाहतूक कशी सुरू करायची असा प्रश्न होता. वाहतुकीची अडचण लक्षात घेता जनतेने पुढाकार घेतला. उड्डाणपुलावरील बॅरिकेट्स हटविले आणि रस्ता सुरू केला.

वीज कनेक्शनची प्रक्रिया सुरू

पुलावर लावण्यात आलेल्या विजेच्या खंब्यांना कनेक्शन मिळालं नाही. त्यामुळं रात्री याठिकाणा उजेड नसतो. त्यामुळं डिझेल जनरेटरचा वापर करून याठिकाणी रात्री लाईट सुरू केले जातात. विजेच्या कनेक्शनची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे.

Video – Nagpur उपलवाडीतील गोदामाला आग, तीन गोदाम जळून खाक

विदर्भात थंडीची लाट, पारा 13 अंशांच्या खाली, पुढील आठवडा कसा राहणार?