AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Corona | विदर्भातील कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय?; नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक म्हणतात…

नागपूरसह पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत वेगानं कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय. तिसरी लाट पिकवर असताना चोवीस जानेवारीला नागपूर जिल्ह्यात 44.84 पॅाझिटीव्हिटी रेट होता. सध्या नागपूर जिल्ह्यातील पॅाझिटीव्हिटी रेट 21 टक्क्यांच्या खाली आलाय.

Nagpur Corona | विदर्भातील कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय?; नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक म्हणतात...
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 31, 2022 | 3:09 PM
Share

नागपूर : नागपूरप्रमाणे भंडारा जिल्ह्यात पिकवर असताना तीस टक्के पॅाझिटीव्हिटी रेट (Positivity rate) होता. आता अकरा टक्क्यांवर आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात पस्तीस टक्क्यांवरचा पॅाझिटीव्हिटी रेट अकरा टक्क्यांवर आलाय. आरोग्य उपसंचालकांनी ही माहिती दिलीय. कशाप्रकारे नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत कोरोनाची तिसरी लाट (The third wave of corona) ओसरतेय ते पाहुया. नागपूर जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 44.84 टक्के टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 21 टक्के आहे. भंडारा जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 30 टक्के टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 11 टक्के आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 35 टक्के टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 14 टक्के आहे. गडचिरोली जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 49 टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 20 टक्के आहे. गोंदिया जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 25 टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 13 टक्के आहे. तर वर्धा जिल्ह्यात पिक पॅाझिटीव्हिटी रेट 43 टक्के होता. सध्याचा पॅाझिटीव्हिटी रेट 18 टक्के आहे, अशी माहिती नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॅा. संजीव जैसवाल (Dr. Sanjeev Jaiswal) यांनी दिली.

गेल्या चोवीस तासांत बारा बळी

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये चढ-उतार कायम आहे. रविवारी जिल्ह्यात 12 कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. दिवसभरात नव्याने तीन हजार 57 बाधितांची भर पडली. बाधितांच्या तुलनेत दीडपट म्हणजेच चार हजार 589 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. शहरातून दहा तर जिल्ह्याबाहेरील दोन अशा बारा कोरोनाबळींची नोंद करण्यात आली. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या दहा हजार 234 वर गेली आहे.

तीन हजार सत्तावन जणांचे अहवाल सकारात्मक

दिवसभरात जिल्ह्यात अकरा हजार 338 चाचण्या करण्यात आल्यात. त्यामध्ये शहरात 8302 व ग्रामीणमध्ये 3036 चाचण्यांचा समावेश आहे. यापैकी 26.27 टक्के म्हणजेच तीन हजार 57 जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. यामध्ये शहरातून 1770, ग्रामीणमधून 1183 व जिल्ह्याबाहेरील 104 जणांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5.59 लाख 403 वर पोहचली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सातत्याने बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढल्याने प्रशासनानेही समाधानी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 93.80 टक्क्यांवर पोहचले आहे.

एसटीचे स्टेअरिंग येणार महिला कर्मचाऱ्यांच्या हाती; काय आहे परिवहन महामंडळाचा प्लान?

Nagpur Mihan | मिहानमध्ये तारांकित हॉटेलची होणार उभारणी; रोजगार निर्मितीला कशी मिळेल चालना?

Nagpur NMC Election | नागपूर महापालिका निवडणुकीचा धुरळा; भाजपा उमेदवार निवडीसाठी करणार सर्व्हे

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.