गोवारी शहीद स्मारकासमोर हजारो बांधव नतमस्तक, 28 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं

114 गोवारी बांधवांचं रक्त गोवारी शहीद स्मारक परिसरात सांडलं होतं. या घटनेचा 28 वर्षे पूर्ण झाली आहेत.

गोवारी शहीद स्मारकासमोर हजारो बांधव नतमस्तक, 28 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं
गोवारी शहीद स्मारक
Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Nov 23, 2022 | 4:48 PM

 

नागपूर – 1994 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनवर आपल्या मागण्यांसाठी मोर्चा घेऊन आलेल्या गोवारी बांधवांच्या मोर्च्यात चेंगराचेंगरी झाली. 114 गोवारी बांधव यात शहीद झाले होते. या दिनाला गोवारी शहीद दिवस पाळतात. नागपूर येथील गोवारी स्मारकवर हजारो गोवारी बांधव एकत्रित येतात. शाहीद झालेल्या आपल्या आप्त नातेवाईकांना श्रद्धांजली अर्पण करतात. आज 23 नोव्हेंबरला या घटनेला 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज सुद्धा गोवारी स्मारकवर हजारो गोवारी बांधव उपस्थित झालेत. श्रद्धांजली दिली जात आहे. यावेळी गोवारी बांधवांच्या मनात 28 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या होत आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी नागपूर येथील झिरो माईल्स परिसरातील गोवारी शहीद स्मारकाला भेट देऊन श्रध्दांजली वाहिली. अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी आजच्याच दिवशी 23 नोव्हेंबर रोजी चेंगराचेंगरी होऊन 114 गोवारी बांधव शहीद झाले होते. दरवर्षी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून गोवारी बांधव या ठिकाणी अभिवादन सोहळ्याला उपस्थित असतात. आज 28 वा गोवारी शहीद स्मृती दिवस आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंत महाविद्यालयातील आपल्या कार्यक्रमानंतर ताफ्यासह शहीद स्मारकाला भेट दिली. स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केले. या दुर्घटनेत शहीद झालेल्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

23 नोव्हेंबर 1994 चा दिवस नागपूरच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. 114 गोवारी बांधवांचं रक्त गोवारी शहीद स्मारक परिसरात सांडलं होतं. या घटनेचा 28 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्तानं हजारो गोवारी बांधव येथे येतात. जे हुतात्मे झालेत त्यांचे स्मरण करतात.