Vijay Vadettiwar: ते कंत्राट रद्द झाल्यानेच पेटले आंदोलन, विजय वडेट्टीवार यांचा मनोज जरांगेंवर गंभीर आरोप
Vijay Vadettiwar big Allegation on Manoj Jarange: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे दुसरेच कारण असल्याचे सांगितले. ते कंत्राट रद्द झाल्यानेच आंदोलनाची धार वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

गजानान उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले. हैदराबाद गॅझेटसह कुणबी दाखल्यांच्या प्रमुख मागणीवरून त्यांनी 20 दिवसांचे आमरण उपोषण केले. मुंबईतही त्यांचा मोर्चा धडकणार होता. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळाने यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत दिली. त्यांनी उपोषण सोडले. पण या आंदोलनामागे दुसरेच अंडरकरंट असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
ते कंत्राट रद्द झाल्यानेच आंदोलनाला धार
“माझ्याकडे पुरावे आहेत, मी पुरावे पाठवेल, पाहिजे असेल तर आत्ताच दाखवू शकतो, त्यामुळे त्या चॅलेंजला मी फुसका बार समजतो, विनाकारण काहीतरी आणू नये, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते घेतलेला काम आहे, इरिगेशनच काम आहे, त्यांचे फोटो आहेत जरांगे पाटलांचा ड्रायव्हर कार चालवणारा, कधी कॉन्ट्रॅक्टर मंचावर बसलेला तो कॉन्ट्रॅक्टर आहे, मी विना पुरावे बोलत नाही त्यामुळे या विषयाचे पुरावे ज्यांना पाहिजे त्यांना पाठवून देईल.” असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
-त्यावर अधिक खोलवर बोलणे योग्य नाही, टप्प्याटप्प्यांना सांगू पण एक काम सिंचन विभागाने दिलेलं काम आहे आणि ते काम रद्द करण्याचा आदेश सुद्धा सीएम ऑफिसने दिला होता, त्यामुळे हा झालेला गोंधळ आहे आणि त्यामुळे आंदोलनाचे धार वाढली असेल अशी मला शंका आहे, असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला.
आता दिल्लीत मोठे आंदोलन
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपुरात ओबीसी समितीची बैठक घेतली. ओबीसींच्या जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दिल्लीतील आंदोलनाच्या तयारीसाठी नागपुरात बैठक झाली. बैठकीला नागपूर विभागातील ओबीसी पदाधिकारी सहभागी होते. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
SIR वरून निवडून आयोगावर टीका
एसआयआरच्या नावाखाली महाराष्ट्रात विरोधकांच्या मताची छाटणी करून, जनतेच्या मनातून उतरलेला हे सरकार सत्तेमध्ये येण्यासाठी धडपडताना दिसून येत आहे, महाराष्ट्रातील एसआयआर – 2026 प्रक्रियेतील जे अनअकाउंटेबल मतदार आहेत, त्या मतदारांबाबत पारदर्शक व सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. महाराष्ट्रात एसआयआर मधील आकडे पाहिले तर आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार आयोगाच्या स्थलांतरित, मृत, दुबारनोंदी असलेले मिळून जवळपास 2 कोटी 66 लाख 88 हजार 478 इतक्या मतदारांवर प्रश्न निर्माण झाला आहे म्हणजे 21% मतदार अंतिम यादीतून उघडले जाण्याची शक्यता आहे, त्यातून 76 लाख 135 मतदार स्थलांतरित म्हणून दाखवले आहेत, 45 लाख 520 मतदार गैरहजर दाखवले आहेत. विसंगती अशी की हे 62 लाख 48 हजार 281 मतदार दाखवले आहे. हा सगळा आकडा बघितला तर 2 कोटी 10 लाख 88 हजार इतक्या घरापर्यंत जातो, असा आरोप ही काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाचे ट्विट आलं, ज्यावेळी अल्पसंख्यांक असलेले 37 मतदार संघामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार वाढले गेले, तो आकडा 29.77 टक्के आहेत. मुस्लिमबहुल,एसी, एसटी मतदारसंघ आहेत, त्यात हा घोळ केला आहे. आयोगाचे विश्लेषण आले की आम्ही मायनॉरिटी न बघता इतर मतदारसंघातूनही मतदार कमी झाल्याचं म्हटलं आहे, ते म्हणतात की मुस्लिम मतदार बहुसंख्य असलेले मतदारसंघात (so called muslim) या पद्धतीने भाषा वापरणे योग्य आहे का? सत्ताधारांच्या मतदारसंघात कमी होण्याचे प्रमाण नाहीआहे,ते विरोधकांच्या मतदारसंघात कमी झाले आहे, 76 लाख मतदार हे स्थलांतरित कसे? असा आम्ही विचारल्यावर त्यांच्याकडे उत्तर नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.