AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या लाल वायरवर पाय पडला अन्.. मुंबईच्या महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता भयंकर घडलं..

Kalachowki cha Mahaganpati Mumbai : मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 6 जणांना विद्युत शॉक लागल्याची धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी असतानाच ही घटना घडली. आता याबाबत मोठी अपडेट पुढे येतंय.

त्या लाल वायरवर पाय पडला अन्.. मुंबईच्या महागणपतीच्या मंडपासमोर रात्री दोन वाजता भयंकर घडलं..
Lalbaug Kalachowki Mahaganpati
| Updated on: Sep 20, 2026 | 10:52 AM
Share

मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 6 जणांना विद्युत शॉक लागल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. ज्यानंतर एकच खळबळ उडाली. लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी असतानाच ही घटना घडली. काळाचौकीच्या महागणपती येथे रात्री उशिरा जवळपास 2 च्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्रिशमन दलाने धाव घेतली. एकूण 6 जणांना मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात 2 मुलं आणि 3 मुली यांचा समावेश आहे. एका महिलेचाही समावेश आहे. सध्या मसीनामध्ये 4 रुग्ण आयसीयूमध्ये भर्ती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळत आहे. या घटनेत जीव जाणाऱ्यांचा आकडा 2 वर गेला. 4 जणांवर मासिना रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना नक्की कशी घडली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

महागणतीच्या मंडपा पुढे एक कोल्ड्रिंक्सचा स्टॉल उभारण्यात आला होता. याच स्टॉलसाठी वीजेचे कनेक्शन देण्यात आले. लाल रंगाची वायर सोडण्यात आली. याच वायरवर या सहा जणांचा पाय पडला आणि त्यांना वीजेचा झटका बसला. 2 जणांचा जीव यात गेला असून अजून 12 वर्षाच्या रूही सिंहची हिची तब्येत चिंताजनक आहे. बाकी चार जणांवर उपचार सुरू आहे.

या घटनेनंतर बेस्टचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडूनही तपास केला जात आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मीटर पुरवठा खंडीत केल्याची माहिती मिळतंय. रागिणी यादव वय 8 जीव गेला, सुजाता वय वर्ष 33 यांचा जीव गेला, रुही सिंग वय 12 प्रकृती गंभीर, किरण नाईक वय 19 प्रकृती स्थिर, साहिल तरे वय 19, तन्वी हांडे वय 19 प्रकृती स्थिर सध्या यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एका निष्काळजीपणामुळे दोन जणांचा जीव गेला. यासोबतच नातेवाईकांकडून गणपती मंडळावरही गंभीर आरोप करण्यात आली. रात्री दोन वाजता गणपती पाहण्यासाठी आम्ही रांगेत असताना ही घटना घडल्याचे उपस्थितांनी सांगितले. काळाचौकीचा गणपती मंडळाने हा लाईट लावताना सुरक्षेची काळजी घेतली नव्हती, असा आरोप आता नातेवाईकांकडून केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे.

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?