नागपुरातील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार?

| Updated on: Nov 11, 2021 | 6:16 PM

हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार आहे. परंतु, नियमानुसार, अधिवेशनाच्या 45 दिवसांपूर्वी होणारी सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नाही. अधिवेशनाला फक्त 25 दिवस उरलेले आहेत. त्यामुळं हे अधिवेशन नियोजित तारखेला होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार?
Follow us on

नागपूर : येथील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून होणार आहे. परंतु, नियमानुसार, अधिवेशनाच्या 45 दिवसांपूर्वी होणारी सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नाही. अधिवेशनाला फक्त 25 दिवस उरलेले आहेत. त्यामुळं हे अधिवेशन नियोजित तारखेला होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळं ते बैठकीसाठी वेळ देऊ शकले नाहीत. यासंदर्भातील बैठकीसाठी मुख्यमंत्री बैठकीत असणे आवश्यक असते.

अधिवेशनाची तारीख वाढण्याची शक्यता

बांधकाम विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळेवर सर्व प्रकारची तयारी होणे अशक्य आहे. परिस्थिती पाहता अधिवेशनाची तारीख वाढण्याची शक्यता आहे. सध्या मुंबई विधानभवन सचिवालयातून प्रस्तावित तारखेनुसार तयारी करणे सुरू आहे.

रंगरंगोटीची कामे सुरू झाली नाहीत

सचिवालयानं स्थानिक पत्रकारांच्या प्रवेशाच्या पाससाठी प्रक्रिया सुरू केली आहे. अधिवेशनाच्या 10 दिवसांपूर्वी नागपुरात सचिवालयाचे अधिकारी पोहचतात. त्यासाठी विधानभवन परिसरात रंगरंगोटी केली जाते. सद्या अशाप्रकारच्या कोणत्याही हालचाली नाहीत. टेंडर देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आदेश मिळताच पुढील कारवाई केली जाईल.

इतर बातम्या : 

नागपूर सुधार प्रन्यासचा नागरिकांना झटका, विकासशुल्क तीनपट वाढविले

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं, सन्मानपूर्वक तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु, विजय वडेट्टीवारांचं आश्वासन