महिला पोलिसानं केली आत्महत्या, घरीच लावला गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर

| Updated on: Nov 19, 2021 | 10:29 AM

काल रात्री पिपळा फाटा परिसरातील बोरकुटे ले-आउट येथील घरी गळफास लावला. संबंधित पोलीस महिलेला पाच वर्षांची मुलगी असल्याची माहिती आहे. तिच्या संगोपनाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महिला पोलिसानं केली आत्महत्या, घरीच लावला गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर
Follow us on

नागपूर : हुडकेश्वर ठाण्यात काम करणाऱ्या महिला पोलीस हवालदारानं राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अश्विनी खंडागळे असं मृत पोलीस हवालदाराचं नाव आहे. काल रात्री तिच्या पिपळा फाटा परिसरातील बोरकुटे ले-आउट येथील घरी गळफास लावला. संबंधित पोलीस महिलेला पाच वर्षांची मुलगी असल्याची माहिती आहे. तीच्या संगोपणाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

अश्निनी खंडागळे या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या तणावात होत्या आणि ड्युटीवर जात नव्हत्या, अशी माहिती आहे. त्यांचे पती बीएसएफमध्ये बिहार येथे कार्यरत आहेत. गुरुवारी दिवसभर त्यांच्या घरचा दरवाजा बंद होता. रात्रीही दरवाजा खोलण्यात आला नाही. शेजारच्यांना शंका आली. आतमध्ये बघीतले तेव्हा अश्विनी मृतावस्थेत आढळल्या. हुडकेश्वर पोलिसांना याची सूचना देण्यात आली. पोलीस तपास करीत आहेत. खंडागळे दाम्पत्यांना पाच वर्षांची मुलगी असल्याची माहिती आहे. पण, मुलगी कुठे आहे, याची माहिती मिळू शकली नाही.

काचेची बॉटल फोडली डोक्यावर

हुडकेश्वर पोलीस ठाण्या अंतर्गत दुखापत करणाऱ्या आरोपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींनी सन्मार्गनगरातील प्रेम शंकरराव राऊत यांच्या डोक्यावर काचेची बॉटल फोडून दुखापत केली. महिला बचतगटाच्या पैशाच्या वादातून ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सतीश धुर्वे, बाळा पाटील, विशाल चुन्नावार या तिघांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना ही न्यू म्हाडगीनगरातील आर्याबार येथे घडली.

सक्करदऱ्यात सव्वादोन लाखांची चोरी

दिघोरीतील आराधनानगरातील सुचिता विशाल कराडे यांच्या गाडीच्या डिक्कीतून दोन लाख 30 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. सुचिता यांनी तीन लाख रुपये बँकेतून काढले. दुचाकीच्या डिक्कीत ताजबाग येथील पार्किंगमध्ये गाडी ठेऊन त्या दर्शनाला गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी डिक्कीतील रक्कम लंपास केली. सक्करदरा पोलिसांत त्यांनी याची तक्रार दाखल केली.

स्कूल व्हॅनचालकाची विद्यार्थिनीशी सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि…

हाय कोर्टाची पोलीस आयुक्तांना नोटीस, गंगा जमुना परिसर सील का केला अशी विचारणा