स्कूल व्हॅनचालकाची विद्यार्थिनीशी सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि…

सावनेर येथील निखिल आत्राम असं आरोपीचं नाव आहे. सक्करदरा येथील मोना (काल्पनिक नाव) दहावीत शिकते. निखिल हा स्कूल व्हॅन चालवितो. तो नागपुरात आपल्या मामाकडे राहतो. स्कूल व्हॅन चालवितो. गेल्या दोन वर्षांपासून तो मोनाला शाळेत सोडून द्यायचा. ती त्याला आवडायला लागली.

स्कूल व्हॅनचालकाची विद्यार्थिनीशी सलगी, आईला सापडला नको त्या अवस्थेत आणि...
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 9:31 AM

नागपूर : तो 21 वर्षांचा रोज स्कूल व्हॅननं तिला घ्यायला यायचा. ती 15 वर्षांची त्याच्या गाडी बसून शाळेत जायची. तो तिच्यासाठी व्हॅनमध्ये जवळ जागा देत होता. दोघांचेही सूत जुळले. तो एक दिवस तिची आई नसताना तिला भेटायला घरी आला. पण, आई अचानक घरी आल्यानं दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. शेवटी मुलीच्या आईने त्याच्याविरोधात सक्करदरा पोलिस ठाण्यात अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली.

सावनेर येथील निखिल आत्राम असं आरोपीचं नाव आहे. सक्करदरा येथील मोना (काल्पनिक नाव) दहावीत शिकते. निखिल हा स्कूल व्हॅन चालवितो. तो नागपुरात आपल्या मामाकडे राहतो. स्कूल व्हॅन चालवितो. गेल्या दोन वर्षांपासून तो मोनाला शाळेत सोडून द्यायचा. ती त्याला आवडायला लागली.

इतर मुलांना घरी सोडून दिल्यानंतर मोनाला शेवटी घरी पोहचवून द्यायचा. व्हॅन चालविताना तिच्याशी बोलत असायचा. दोन-तीन महिन्यांत त्यांच्यात आकर्षण निर्माण झाले. तीसुद्धा त्याच्यावर प्रेम करून लागली. कधी-कधी ती शाळेला बुट्टी मारून फिरायला जायची. दरम्यान, कोरोनामुळं दोघांचं भेटणं कमी झालं. एक दिवस तो मोनाला भेटायला चक्क घरी आला. मोनाची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. पण, घराशेजारच्या महिलेनं तिला फोन केला. तुमच्या घरात अनोखळी व्यक्ती शिरला असून दरवाजा आतून बंद असल्याचं सांगितलं. त्यामुळं मोनाची आई लगबगीनं घरी आली. तेव्हा ते दोघेही नको त्या अवस्थेत सापडले. मोनानं त्याचीच बाजू घेतली. पण, आईच्या आग्रहास्तवर त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. निखिलला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली.

कळमन्यात वाहनचालकाविरोधात बलात्काराचा गुन्हा

कळमना घटनेतील आरोपी मनीष पराते हा 45 वर्षांचा आहे. तो वाहनचालक असल्यानं कधी घरी यायचा, तर कधी रात्री बाहेरच राहायचा. त्यामुळं चार घरे बाजूला असलेली 14 वर्षांची मुलगी त्याच्या पत्नीसोबत झोपायला यायची. याचा गैरफायदा मनीषनं घेतला. तिच्यावर अत्याचार केला. पण, तिनं ही बाब घरच्यांना सांगितली नाही. मासिक पाळी चुकल्यानं तिच्या आईला शंका आली. तिची तपासणी केल्यानंतर ती चार महिन्यांची गरोदर असल्याचं स्पष्ट झालं. पीडितेच्या तक्रारीवरून मनीषविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) (जे) भादंवि सहकलम ४, ८, १२ पोक्सो अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हाय कोर्टाची पोलीस आयुक्तांना नोटीस, गंगा जमुना परिसर सील का केला अशी विचारणा

VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.