VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले.

VIDEO: समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे तीन गंभीर आरोप; नव्या आरोपांनी खळबळ
Nawab Malik
सुनील काळे

| Edited By: भीमराव गवळी

Nov 18, 2021 | 12:17 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आज तीन गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका आयपीएस अधिकाऱ्याच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकले. आधीच्या पत्नीच्या नातेवाईकालाही खोट्या गुन्ह्यात अडकवले आणि शाळा सोडल्याचे बनावट दाखले सादर केल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गंभीर आरोप केला. दाऊद वानखेडेंचा फर्जीवाडा समोर येत आहे. एक आयपीएस अधिकारी त्यांचा शेजारी होता. त्यांच्याशी त्यांचं बिनसलं. त्यांनी या अधिकाऱ्याच्या मुलाला एका गुन्ह्यात फसवलं. त्या मुलाच्या कुटुंबीयाने बेल अॅप्लिकेशन केली. त्यात एनसीबीचा कोणताही अधिकारी घरी आला नाही. त्या मुलाला घरातून बोलावण्यात आलं. खोटा गुन्हा तयार करून त्याला अटक केली गेली. ज्या मुलाला फसवलं त्याचे वडील आयपीएस अधिकारी आहे. शेजाऱ्याशी भांडण झालं म्हणून त्याला अटक केली, असं मलिक म्हणाले.

पत्नीच्या चुलत भावालाही अडकवलं

वानखेडे यांनी ज्या मुलीला घटस्फोट दिला ती मुलगी कधीही विरोधात जाईल म्हणून तिच्या एका चुलत भावाला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं. एका ड्रग्ज पेडलरच्या माध्यमातून त्याच्या घरात ड्रग्ज ठेवलं गेलं आणि या महिलेच्या चुलत भावाला अटक केली. मुलीच्या घरच्यांना घाबरवलं. आमच्या विरोधात बोलला तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज प्रकरणात अटक करू अशी धमकी देण्यात आली. मात्र वानखेडेंचा सर्व फर्जीवाडा बाहेर येत आहे, असं त्यांनी सांगितलं.

आज होणार फैसला

वानखेडेंच्या दाखल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही पालिकेची सर्व कागदपत्रं पाहिली आहेत. शाळेच्या दाखल्यापासून सर्व गोष्टी बाहेर काढल्या. कोर्टासमोर ठेवल्या. सर्व कागदपत्रे आम्ही त्यांच्या वकिलांना दिली आहेत. आज दुपारी न्यायाधीशाच्या चेंबरमध्ये त्यावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर मी ट्विट करावं की नाही, पत्रकार परिषदा घ्याव्या की नाही यावर कोर्ट निर्णय देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. समीर वानखेडेंच्या वडिलांने आमच्या विरोधात सव्वा कोटीचा मानहानीचा दावा केला आहे. मला ट्विट करण्यापासून रोखण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यावर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी होणार आहे.

वानखेडेंची नोकरी जाणारच

समीर वानखेडे हे खोट्या नोटांचे खिलाडी आहेत. त्यांना बनावट सर्टिफिकेट बनवणं कितीसं अवघड आहे. ते फर्जीवाडा आणि बनावट नोटात मास्टर आहेत. त्यांनी जन्माचं बर्थसर्टिफिकेट दाखवावं. खोटी कागदपत्रं दाखवू नका. त्यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे. त्यांनी 1993मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली. रजिस्टर गहाळ केलं. पण हे सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत. खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

झूठ बोले कौआ काटे, भाजपच्या काळात दंगली झाल्याच नाहीत, अनिल बोंडे खोटं बोलत असल्याचा मलिक यांचा आरोप

निलंबनाच्या भीतीनं ST कर्मचाऱ्याकडून विष प्राशन, बुलडाण्याच्या विशाल अंबलकर यांचं अकोल्यात निधन

अनिल देशमुखांना बोगस केसमध्ये अडकवलं, हा राजकीय डाव उलटवून लावू; नवाब मलिक फ्रंटफूटवर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें