डिलिमिटेशनच्या मुद्द्यात नाना पटोले यांनी केले शरद पवार यांच्याबद्दल मोठे विधान, तो त्यांचा..
डिलिमिटेशन बिलावरून देशभरात मोठा वाद सुरू आहे. इंडिया आघाडी या बिलाच्या विरोधात आहे. त्यातच भाजपाने विशेष अधिवेशन या बिलासाठी बोलावले आहे. मात्र, यादरम्यानच इंडिया आघाडीला मोठा झटका बसला.

डिलिमिटेशन बिल म्हणजेच मतदारसंघ पूनर्रचना विधेयकाची देशभरात चर्चा सुरू आहे. इंडिया आघाडीकडून या बिलाला विरोध केला जात आहे. नरेंद्र मोदी सरकारने या याकरिता विशेष अधिवेशन बोलावले. काही महिन्यांपूर्वी डिलिमिटेशन आणि महिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक पडलं होतं. त्यातच इंडिया आघाडीकडून हे बिल देखील पाडले जाणार आहे. दिल्लीत इंडिया आघाडीने काल बैठक घेतली. मात्र, शरद पवार यांच्या पक्षाने या बैठकीकडे पाठ फिरवली. यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली. शरद पवार यांचे खासदार या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट आहे. जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाकडून आपली भूमिका स्पष्ट केली. पण सुप्रिया सुळे सावध भूमिका घेताना दिसल्या. संख्याबळाचा हा आकडा गाठण्यासाठी सरकारला बरचे काही करावे लागत आहे. पवारांचे खासदार या बिलाला पाठिंबा देतील, अशी सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेस पक्षकडून पवारांच्या पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. हेच नाही तर शरद पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाही, असा थेट आरोपच विजय वडेट्टीवार यांनी केला. शरद पवार यांच्या निर्णयाबद्दल बोलताना राहुल गांधीही दिसले. या बिलाला पाठिंबा दिल्यानंतर सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री होणार, अशीही एक चर्चा मध्यंतरी रंगली.
त्यातच आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मोठे विधान केले. नाना पटोले यांनी म्हटले की, आता सर्वकाही पवार साहेबांवरच अवलंबून आहे. पण तो त्यांचा निर्णय आहे, त्यांनी काय करावे काय नाही ते. राहुल गांधी यांनी सकारात्मक भूमिका मांडली आहे. देशाच्या लोकांनी राहुल गांधी यांची भूमिका चांगली आहे म्हणत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले.
पंतप्रधान खोटे बोलत आहेत. महिला आरक्षण बिल पारित झाले आहे. युपीएसच्या सरकारमध्ये सोनिया गांधींनी त्यावेळीच पुढाकार घेतला होता.2023 मधील महिला बिल एकाच मताने पारीत झाले. 2024 मध्येच महिला आमदार जास्त राहिल्या असत्या. पण भाजपाच्या या कुटील राजकारणामुळे 2024 मध्ये हे आरक्षण लागू करण्यात आले नाही.