सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचाच होणार विजय – नारायण राणेंना विश्वास

सर्वोच्च न्यायालय आज महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वपूर्ण निकाल देणार आहे. संपूर्ण देशाच लक्ष या निकालाकडे लागलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी ट्विट केले आहे.

सत्ता संघर्षात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचाच होणार विजय - नारायण राणेंना विश्वास
Image Credit source: tv9
| Updated on: May 11, 2023 | 11:41 AM

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाच लक्ष लागलं आहे. शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरु होती. अखेर आज या खटल्यावर सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध नेत्यांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनीही या मुद्यावर त्यांचे मत मांडले असून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचा विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

नारायण राणेंनी ट्विट करत एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथजी शिंदे व देवेंद्र जी फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात कायम राहणार ! असेही त्यांनी म्हटले आहे.

 

शिंदे गटाचे 16 आमदार पात्र ठरतात, की अपात्र यावर बरच काही अवलंबून आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्यातील राजकारणाची पुढची दिशा ठरु शकते. त्यामुळे या निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.