Christmas Special|उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव बाल येशू मंदिर नाशिकमध्ये, देशात फक्त 6 ठिकाणी; प्रागमधून आणली मूर्ती!

| Updated on: Dec 25, 2021 | 1:37 PM

नाशिकमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर बाळ येथूचं मंदिर आहे. 1970 मध्ये कॅथलिक येशूसंघीय संस्थेनं या मंदिराची स्थापना केली.

Christmas Special|उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव बाल येशू मंदिर नाशिकमध्ये, देशात फक्त 6 ठिकाणी; प्रागमधून आणली मूर्ती!
नाशिकमधील बाल येशू मंदिरातील देखणी मूर्ती. (सौजन्यः गुगल)
Follow us on

नाशिकः ख्रिसमस म्हटलं की सांता येतो…लहान मुलांना भरपूर भेटवस्तू आणतो. घराच्या दरवाजाला एक मोजा अडकलेला असतो. त्यात तो कुणाला काय हवंय, काय नकोय ते सारं देतो. त्यामुळं मुलांना ख्रिसमस म्हटलं की सांताची खूप आठवण येते. प्रभू येशूंनी साऱ्या जगाला प्रेमाची शिकवण दिली. तीच हा सांता वाटतो. सांता घरातला असतो, की बाहेरचा हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं ते प्रेमळ वागणं. जसं ख्रिसमस म्हटलं की सांता आठवतो. तसंच मुलांसह साऱ्यांनाच बाल येशूही आठवतो. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये बाल येशूचं एकमेव मंदिर आढळतं. ख्रिसमसनिमित्त या अनोख्या मंदिराची ही ओळख…

1970 मध्ये स्थापना

नाशिकमध्ये नाशिक-पुणे महामार्गावर बाळ येथूचं मंदिर आहे. 1970 मध्ये कॅथलिक येशूसंघीय संस्थेनं या मंदिराची स्थापना केली. संपूर्ण भारतात अशी फक्त सहा मंदिरे आहेत. त्यात चेन्नई व्हॅलेकनी, मंगलोर, माऊंट मेरी, गोवा, मुंबई आणि नाशिकचा समावेश होत. या मंदिरात झेकेस्लोव्हाकियाच्या प्राग येथून बाळ येशूची मूर्ती आणण्यात आली आहे.

दीड दिवसाची यात्रा

बाळ येशू मंदिरामध्ये रोज सकाळ-संध्याकाळी प्रार्थना होते. रविवारची प्रार्थना वेगळी. नाताळ सण, ईस्टर संडे, फेब्रुवारीच्या दुसऱ्या शनिवारी येथे दीड दिवसाची यात्रा भरते. मंदिराचे पक्के बांधकाम करण्यात आलं आहे. प्रार्थनेसाठीही वेगळी व्यवस्थाय. इथल्या येशू संघीय संस्थेकडून सेंट झेव्हिअर्स स्कूलचं कामही पाहिलं जातं.

संत अण्णा चर्च

नाशिकमध्ये कॅथलिक समाजाचे संत अण्णा मंदिर चर्च आहे. जेलरोड भागात चर्चची देखणी इमारत दृष्टीस पडते. या चर्चही स्थापनाही येशू संघीय धर्मगुरू संस्थेनं 1942 मध्ये केली. नाशिक, नगर, नंदुरबार, धुळे, जळगाव या पाच जिल्ह्यातील कॅथलिग ख्रिश्चन समाजाचे हे मुख्य चर्च आहे.

वर्षभर कार्यक्रम

पूर्वी चर्च एका पत्राच्या शेडमध्ये होते. मात्र, 2017 मध्ये त्याचे नूतनीकरण झाले. नाताळनिमित्त येथे दहा दिवस विविध कार्यक्रम होतात. येशू जन्मोत्सव, गुड फ्रायडे, 26 जुलै रोजी संत अण्णा आश्रयदाते सण, मरिया स्वर्गारोहण, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनही येथे साजरा करण्यात येतो.

दिग्गजांचा राबता

बाल येशू मंदिरात दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. विशेषतः अनेक सेलिब्रेटी येथे आवर्जुन हजेरी लावतात. काहीच दिवसांपूर्वी जेनेलिया आणि रितेश देशमुख येऊन गेले होते. देशात अशी फक्त सहा मंदिरं असल्यानं येथे दर्शनासाठी वर्षभर भाविक हजेरी लावतात. सोबतच रम्य अशा नाशिकचं पर्यटनही करतात.

इतर बातम्याः

मालेगावमध्ये पोतं भरून तलवारी सापडल्या…अन् पोलिसही गेले चक्रावून, नेमका काय डाव होता?

भय इथले संपत नाही…कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये नवे नियम, जाणून घ्या माहिती!