Nashik Corona|नाशिकमध्ये आजपासून मुलांचे लसीकरण; प्रत्येक केंद्रावर 500 डोस, कुठे मिळेल लस?

| Updated on: Jan 03, 2022 | 7:01 AM

अतिशय महत्त्वकांक्षी असणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेत नाशिक जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.

Nashik Corona|नाशिकमध्ये आजपासून मुलांचे लसीकरण; प्रत्येक केंद्रावर 500 डोस, कुठे मिळेल लस?
corona vaccination
Follow us on

नाशिकः एक अतिशय महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अखेर आज सोमवार, 3 जानेवारीपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी नाशिकमध्ये 6 ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण 39 लसीकरण केंद्रांवर या मुलांचे लसीकरण केले जाणार आहे.

येथे मिळेल लस

लहान मुलांच्या लसीकरणासाठी शहरी भागात 11 केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत 6 आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे असणार आहेत. तर 29 केंद्र हे ग्रामीण भागात असणार आहेत. गरज पडल्यास प्रत्येक महाविद्यालयातही लसीकरण करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर ईएसआय हॉस्पिटल, सिडको समाज कल्याण कार्यालय, नवीन बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसैन हॉस्पिटल या केंद्रावर ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी सकाळी सकाळी दहा ते दुपारी चारपर्यंत लसीकरण सुरू असेल. प्रत्येक केंद्रावर 500 डोस उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोव्हॅक्सिन लस

अतिशय महत्त्वकांक्षी असणाऱ्या या मोहिमेत जिल्ह्यामध्ये साडेतीन लाख मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्प्यात ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णांलयांमध्ये ही लस देण्यात येणार आहे. या केंद्रांवर प्रतिसाद वाढल्यानंतर इतर ठिकाणी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मार्च महिन्यात आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा यंदा ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. सरकारने तशी तयारी केली आहे. त्यामुळे पहिल्यांदा या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.

मास्क घाला

नाशिक जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचे कुठेही पालन केले जात नाही. ओझरमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या माजी आमदाराने बैलगाडा शर्यत घेऊन हजारो लोकांची गर्दी जमा केली. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून ही शर्यत पार पाडली. तोच कित्ता गिरवत दिंडोरी तालुक्यातील लाखमापूर येथेही हजारो जणांची गर्दी जमवून बैलगाडा शर्यत पार पडली. याप्रकरणी संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम पार पडला. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि एका आमदाराच्या मुलाचा विवाह सोहळा झाला. यावेळीही कोरोना नियमांचा फज्जा उडवण्यात आला. हा गाफीलपणा येणाऱ्या काळात भोवण्याची भीती व्यक्त होत आहे.

इतर बातम्याः

Warkari Bhavan | सुंदर ते ध्यान…नाशिकमध्ये साकारले द्रविडीयन छाप असणारे वारकरी भवन!

Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी