Warkari Bhavan | सुंदर ते ध्यान…नाशिकमध्ये साकारले द्रविडीयन छाप असणारे वारकरी भवन!

Warkari Bhavan | सुंदर ते ध्यान...नाशिकमध्ये साकारले द्रविडीयन छाप असणारे वारकरी भवन!
Warkari Bhavan, Sinnar

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन साकारले आहे. या भवनास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, असे नाव देण्यात आले आहे. या कामासाठी माजी आमदार रामहरी रुपनवर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक 10 लाखांचा निधी दिला. उर्वरित निधी सिन्नरकरांनी लोकवर्गणीतून उभा केला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 02, 2022 | 2:59 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये भव्य अशा वारकरी भवनाची उभारणी करण्यात आली आहे. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या भवनामध्ये अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी सुसज्ज असे ग्रंथालय, विश्रामव्यवस्था आणि अडीच हजार श्रोते बसू शकतील, इतके मोठे सभागृह, विठ्ठलाचे मंदिर असा भव्य प्रकल्प तब्बल पावणेदोन एकरावर साकारलाय. या आगळ्यावेगळ्या भवनाचे उद्या उद्घाटन होणार आहे.

एक कोटीचा खर्च

जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये पावणेदोन एकरावर एक कोटी रुपये खर्च करून एक भव्यदिव्य वारकरी भवन उभारण्यात आले आहे. द्रविडीयन वास्तूशैलीची छाप असलेल्या या मंदिराची वास्तुविशारद जितेंद्र जगताप यांनी वास्तुरचना केलीय. मंदिरात 39 इंच उंचीची विठ्ठल मूर्ती आहे. गेन मेटलच्या या मूर्तीचे वजन 101 किलोय. ही मूर्ती हुभेहुभ पंढरपूरच्या विठ्ठलासारखी साकारण्यात आली आहे. मंदिरातील तुळशीवृंदावन, गरूड आणि हनुमान खांब हे अतिशय आकर्षक आहेत. या भव्या मंदिराचे 4582 फूट चौरस सभागृह असून, येथे 2500 श्रोत्यांची बैठक व्यवस्था करण्यात आलीय. प्रख्यात कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन उद्या सोमवारी होतेय.

नीलम गोऱ्हेंचा निधी

माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संकल्पनेतून हे वारकरी भवन साकारले आहे. यासाठी माजी आमदार रामहरी रुपनवर आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रत्येक 10 लाखांचा निधी दिला. तसे उरलेली रक्कम सिन्नर शहर व तालुक्यातील नागरिकांनी लोकवर्गणीतून उभी केली. या वारकरी भवनास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, असे नाव देण्यात आले आहे. त्यांचा अर्धाकृती पुतळा सभागृहात उभारण्यात आला आहे.

सुसज्ज ग्रंथालय

कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यासाठी या भवनात सुसज्ज ग्रंथालय उभारले आहे. त्यात अभंग, धार्मिक ग्रंथ व पुस्तके आहेत. अध्यात्मिक अभ्यास करणाऱ्यांसाठी या ग्रंथालयाचा उपयोग होईल. शिवाय दोन खोल्यांच्या विश्रामगृहांची उभारणी केलीय. या देखण्या अशा अभ्यासिकेत टाळ, मृदंग, पेटी, तबला वीणा असे भजनाचे साहित्यही आहे. ग्रंथालय आणि पेव्हर ब्लॉक सुशोभीकरणारासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी निधी दिलाय. त्यांच्या आजी मथुराबाई वाजे या राज्यातील पहिल्या महिला नगरपरिषद अध्यक्ष होत्या. त्यांच्या नावे त्यांनी हा निधी दिलाय. या आगळ्यावेगळ्या वास्तूमुळे सिन्नरच्या सौंदर्यात आणि लौकिकात भर पडणार आहे.

इतर बातम्याः

Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध

Nashik| अजब तुझे सरकार…अन् मृत ग्रामसेवकाच्या नावावरची 28 लाखांची वसुली टळली…!

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें