ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या

| Updated on: May 21, 2021 | 12:15 PM

आई आणि मुलीचा पाठोपाठ मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Nashik Daughter suicide drinking sanitizer)

ऑक्सिजन बेडअभावी आईने प्राण सोडले, सॅनिटायझर पिऊन लेकीची आत्महत्या
आईच्या मृत्यूनंतर मुलीची आत्महत्या
Follow us on

नाशिक : आईच्या मृत्यूने व्यथित झालेल्या मुलीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर ऑक्सिजन बेड न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर सॅनिटायझर पिऊन लेकीनेही आयुष्य संपवलं. (Nashik Crime Daughter commits suicide drinking sanitizer after Mother dies lack of oxygen bed)

नाशिकमध्ये राहणाऱ्या जया भुजबळ या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारासाठी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या मृत्यूने कन्या शिवानी भुजबळ व्यथित झाली होती. यातूनच तिनेही टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.

शिवानीने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केली. आई आणि मुलीचा पाठोपाठ मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडली होती. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

नाशिकमध्ये पॉझिटिव्हीटी रेट घसरला

दरम्यान, नाशिक शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 40 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर आल्याने काहीसा दिलासा व्यक्त केला जात आहे. नवे रुग्ण सापडण्याच्या तुलनेत कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसभरात 6000 हून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर 4 हजार 222 नवीन बाधित रुग्ण आढळले. गेल्या 6 दिवसात नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या कोरोनामुक्तांपेक्षा कमी आहे.

लसीकरणावरुन गोंधळ

नाशिक महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातच लसीकरण सुरु आहे. शहरातील इतर केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागले आहेत. 18 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांना उपलब्ध साठ्यानुसार लस मिळणार आहे, इतरांना मात्र अद्याप लसीचा प्रतीक्षा आहे. लस उपलब्धतेची माहिती मिळत नसल्याने नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळत आहे. लस उपलब्ध झाल्यास लसीकरण सुरळीत होईल असा महापालिकेचा दावा आहे.

संबंधित बातम्या :

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

(Nashik Crime Daughter commits suicide drinking sanitizer after Mother dies lack of oxygen bed)