ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत

अमरधाम स्मशानभूमीपर्यंत मायलेकीचा असा प्रवास पाहून अनेकांचे डोळे पाणावले. (Nashik Daughter carries Dead Body of Mother)

ना शववाहिनी मिळाली, ना मदत, माऊलीच्या पार्थिवासह कार चालवत मुलगी स्मशानभूमीत
नाशकात मुलीने आपल्या आईचे पार्थिव गाडीतून स्मशानभूमीत नेले
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 3:37 PM

नाशिक : कोरोनाग्रस्त महिलेच्या निधनानंतर पार्थिव नेण्यासाठी ना शववाहिनी मिळाली, ना कोणाची मदत. अखेर आपल्या माऊलीच्या अखेरच्या प्रवासात तिची कन्याच तिची सारथी झाली. स्वतःच कार चालवत कन्येने आपल्या आईचे पार्थिव स्मशानभूमीपर्यंत नेले. नाशिकमधून काळजाला हात घालणारी ही बातमी समोर आली आहे. (Nashik Daughter carries Dead Body of Mother in own car for Last rites)

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर नाशिकमधील संबंधित महिलेचे निधन झाले. मात्र महिलेचे पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिनी मिळाली नाही. त्यामुळे आईला अखेरचा निरोप देण्यासाठी लेकीने कंबर कसली. ना कोणाची मदत मिळाली, ना कोणाची सोबत. त्यामुळे मुलीने स्वतःच्याच कारमधून आईची अंत्ययात्रा नेली. अमरधाम स्मशानभूमीपर्यंत मायलेकीचा असा प्रवास पाहून अनेकांचे डोळे पाणावले.

कोरोना संकट काळात हृदय पिळवटणारे प्रसंग

कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्राने अनेक हृदयाला चटका लावणाऱ्या घटना पाहिल्या. कधी आई-वडील होम क्वारंटाईन असल्यामुळे लेकीवर अंत्यविधी करण्यास बंधन आल्याचं पाहायला मिळालं, तर कधी लॉकडाऊन लेकरं परराज्यात अडकल्यामुळे स्थानिकांनी वृद्ध पालकांना अग्नि दिल्याचं उदाहरण समोर आलं.

गावात असूनही आई-वडील अंत्यविधीला नाही

मुलीच्या निधनानंतर मुंबईहून पुण्यात आलेल्या आई वडिलांना होम क्वारंटाईन झाल्याने तिचे अंत्यविधीही करता आले नाहीत. मुलीच्या मामानेच तिचे पिंडदान विधी केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील चांडोह येथे गेल्या वर्षी घडली होती. कोरोना दक्षता समितीच्या आक्षेपामुळे गावात असूनही आई वडील अंत्यविधी करु शकले नाहीत. कोरोनामुळे ना अंत्यविधी, ना दशक्रिया विधीना आई वडील येऊ शकले. शेवटी मामांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत ठराविक लोकांमध्येच शेतामध्ये भाचीचं पिंडदान केलं

नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार

लॉकडाऊनमुळे मुलगा-सून बाहेरगावी अडकल्याने सिंधुदुर्गात वृद्धेवर गावकऱ्याने अंत्यसंस्कार केले होते. विशेष म्हणजे आपल्याच घरातील समजून त्यांनी अस्थी विसर्जन, पिंडदान आणि केशार्पण विधीही केले होते.

संबंधित बातम्या :

लॉकडाऊनमुळे तीन मुलं परराज्यात, सोलापुरात वृद्धेचा पतीला मुखाग्नी

वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅक

(Nashik Daughter carries Dead Body of Mother in own car for Last rites)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.