वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅक

वडिलांच्या मृत्यूचं दु:ख शशेंद्र यांना असह्य झाले आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

वडिलांचा कोरोनाने मृत्यू, बातमी कळताच काही तासातच कोरोनाग्रस्त मुलाला हार्ट अटॅक

पनवेल : कोव्हिडमुळे अतिदक्षता विभागात असलेल्या पिता-पुत्राचा एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला (Tambe Father And Son Died In MGM Hospital). नवीन पनवेलमध्ये वास्तव्यास आलेल्या 70 वर्षीय सीताराम तांबे यांचे मंगळवारी (18 ऑगस्ट) रात्री 2 च्या सुमारास कोरोनामुळे निधन झाले. वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त सीताराम यांच्या 40 वर्षीय मुलगा शशेंद्र तांबे यांना कळले. वडिलांच्या मृत्यूचं दु:ख शशेंद्र यांना असह्य झाले आणि त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते देखील एमजीएम रुग्णालयात कोरोनावर उपचारासाठी दाखल होते (Tambe Father And Son Died In MGM Hospital).

बुधवारी (19 ऑगस्ट) सकाळी 12 च्या सुमारास शशेंद्र तांबे यांचा मृत्यू झाला. पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने तांबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही तासांच्या अंतराने पिता-पुत्राच्या मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

शशेंद्र यांचे वडील सिताराम हे काही वर्षांपूर्वी मुबंई महापालिकेतून निवृत्त झाले होते. तर शशेंद्र हे पनवेल परिसरात कोचिंग क्लासमध्ये शिक्षकाची नोकरी करुन आपला उदरनिर्वाह करत होते. शशेंद्र यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुलं असा परिवार आहे. कोरोना आजारामुळे अनेकांच्या कुटुंबांवर उध्वस्त होण्याची वेळ आली असून, कुटुंबातील कर्ते पुरुष गेल्याने अनेकांवर दुःखाचे सावट कोसळले आहे (Tambe Father And Son Died In MGM Hospital).

अंत्यसंस्कारासाठी पालिकेने 6 हजार मागितले

पनवेल पालिकेमार्फत कोरोना मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नवीन पनवेल येथील पोदी येथे आणि पनवेल शहरातील अमरधाम येथे व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. दोन्ही ठिकाणी असलेल्या विद्युत शव दाहिन्या खाजगी संस्थेमार्फत चालवल्या जात असून विद्युत दाहिनीवरील अंत्यसंस्कारासाठी पोदी येथे 2,500 तर अमरधाम येथे 2,000 रुपये रक्कम आकारण्यात येते.

विद्युत दाहिनीत बिघाड झाल्यास लाकडावरील अंत्यसंस्कारासाठी 5 हजार रुपये आकारले जातात. मात्र, तांबे कुटुंबीयांच्या मृत्यूनंतर सीताराम यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी 6 हजार रुपये आकारण्यात आले आहेत.

Tambe Father And Son Died In MGM Hospital

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील दुकानदारांना दिलासा, दुकानं दररोज उघडण्यास आयुक्तांची परवानगी

Ganeshotsav 2020 | नवी मुंबईत गणेश मूर्तींची होम डिलीव्हरी, गर्दी टाळण्यासाठी मूर्तीकारांची शक्कल

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *