नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने एका दिवसात चौघांचा मृत्यू, नेमकं कारण काय?

| Updated on: Apr 11, 2021 | 7:08 PM

अचानक चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने शनिवारी नाशिकमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. Nashik four person died

नाशिकमध्ये चक्कर येऊन पडल्याने एका दिवसात चौघांचा मृत्यू, नेमकं कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नाशिक: चक्कर येऊन पडल्याने शनिवारी नाशिकमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या आहेत. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून 40.3 अंशापर्यंत पोहोचलं आहे. उष्माघाताचा फटका बसू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आले आहे. (Nashik four person died due to giddiness in one day)

आकस्मात मृत्यूंची नोंद

अचानक चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने शनिवारी नाशिकमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. चक्कर येण्याचे नेमके कारण समजू शकले नसून याप्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कुलाबावाला चक्कर येऊन दुचाकीरुन खालीपडून मृत्यू

पहिल्या घटनेत देवळाली कॅम्प परिसरात इद्रीस इसाक कुलाबावाला (70, रा. सदर बाजार, देवळाली कॅम्प) यांचा मृत्यू झाला. शनिवारी (10 एप्रिल) सायंकाळच्या सुमारास कुलाबावाला हे मोटरसायकलवरून जात असताना अचानक चक्कर येवून ते खाली पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पायी जात असताना चक्कर येऊन मृत्यू

दुसऱ्या घटनेत सातपुर येथील व्यक्तीचा मृत्यू झाला. येथील राजू जेठालाल राठोड (५६, रा. श्रमिकनगर) हे शनिवारी कार्बन नाका येथून रस्त्याने पायी जात असताना अचानक चक्कर येऊन पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राहत्या घरी चक्कर येऊन तरुणाचा मृत्यू

रोकडोबावाडी येथील आकाश टायटस निकाळजे (27) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी राहत्या घरी अचानक चक्कर येवून आकाश बेशुद्ध पडला. त्यामुळे उपचारासाठी त्याला बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकत्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

राहत्या घरी चक्कर येऊन वृद्धाचा मृत्यू

तर चौथी घटना, इंदिरानगर परिसरात घडली. येथील यशवंत दत्तात्रय कुलकर्णी (78) हे शनिवारी (10 एप्रिल ) दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरी अचानक चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

संबंधित बातम्या

चांगलं जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, खेळ आणि मनोरंजनाची सुविधा, नाशिकच्या स्टेडियममध्ये सुसज्ज कोविड सेंटरची उभारणी

Video: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची परवड, व्हेंटिलेटर बेडसाठी हेळसांड सुरु

(Nashik four person died due to giddiness in one day)