चांगलं जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, खेळ आणि मनोरंजनाची सुविधा, नाशिकच्या स्टेडियममध्ये सुसज्ज कोविड सेंटरची उभारणी

नाशिकच्या क्रीडा संकुलातील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये संपूर्ण 180 ऑक्सिजन बेड्स आणि 105 सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे (Chhgan Bhujbal visit Nashik new covid center at Minatai Thackeray Stadium).

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:04 PM, 10 Apr 2021
चांगलं जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, खेळ आणि मनोरंजनाची सुविधा, नाशिकच्या स्टेडियममध्ये सुसज्ज कोविड सेंटरची उभारणी

नाशिक : नाशिकच्या क्रीडा संकुलातील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये संपूर्ण 180 ऑक्सिजन बेड्स आणि 105 सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांना चांगले जेवण, पिण्याचे पाणी, औषधे, खेळ आणि मनोरंजनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नाशिकचे पालमंत्री छगन भुजबळ यांनी आज या कोविड सेंटरची पाहणी केली (Chhgan Bhujbal visit Nashik new covid center at Minatai Thackeray Stadium).

स्टेडियममध्ये 180 ऑक्सिजन बेड्स आणि 105 सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर

नाशिक शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्वातून मेट भुजबळ नॉलेज सिटी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि नाशिक महानगरपालिका यांच्या समन्वयातून विभागीय क्रीडा संकुलातील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये संपूर्ण 180 ऑक्सिजन बेड्स आणि 105 सीसीसी बेड्सचे कोविड सेंटर उभारण्यात येत

छगन भुजबळ यांच्यासह ‘या’ पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी

या कोविड केअर सेंटरची नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि मनपा आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहर अभियंता संजय घुगे, मनपा प्रकल्प संचालिका डॉ.कल्पना कुटे, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक,कविता कर्डक,आंबदास खैरे, समाधान जाधव, गौरव गोवर्धने यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटरची उभारणी

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या संकटाशी सामना करण्यासाठी शासनास मदत व्हावी, अशी संकल्पना भुजबळ नॉलेज सिटीचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मांडली. त्यानुसार विभागीय क्रीडा संकुलातील स्व. मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे संपूर्ण 180 ऑक्सिजन बेड्सचे नाशिक शहरातील कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. तसेच या कोविड सेंटर मध्ये 105 सीसीसी बेड्स असणार आहे (Chhgan Bhujbal visit Nashik new covid center at Minatai Thackeray Stadium).

हेही वाचा : राज्याला दिलासा, दिवसभरात 53 हजार 5 रुग्ण कोरोनामुक्त, तर 55 हजार 411 नव्या रुग्णांची नोंद