Nashik : नाशिकच्या इगतपुरीत 4 घरफोडीच्या घटना, सोनं, दागिन्यांसह रोख रक्कम लुटून चोर फरार

| Updated on: Jul 23, 2022 | 8:20 AM

Igatpuri Theft : नाशिकच्या इगतपुरीत 4 घरफोडीच्या घटना

Nashik : नाशिकच्या इगतपुरीत 4 घरफोडीच्या घटना, सोनं, दागिन्यांसह रोख रक्कम लुटून चोर फरार
Follow us on

इगतपुरी, नाशिक : इगतपुरी (Igatpuri Theft) शहरातील जुना गावठा परिसरातील भवानीनगर येथे मध्यरात्रीच्या सुमारात आज्ञात चोरांनी चार ठिकाणी घरफोडया करून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आदि मुद्देमाल (Jewellery and Cash) घेवून पलायन केल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे .या घटनेत फिर्यादि संदिप मधुकर गाेवर्धने वय 30 वर्षे . रा . भवानी नगर , इगतपुरी , व्यावसाय खाजगी नोकरी यांच्या फिर्यादि वरून पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संदिप गोवर्धने यांच्या राहात्या घराचे कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी मध्यरात्रीत आत प्रवेश करीत घरातील लोखंडी कपाटाचे कुलुप तोडुन सुमारे 54 हजार 500 रुपये किमंतीचे सोन्याचे दागीने त्यात दोन सोन्याचे कर्णफुले, 3 नथ, 3 आंगठया , सोनसाखळी,चांदिचे जोडवे , आदी ऐवज चोरी गेल्याचे फिर्यादित म्हटले आहे .

इतर तीन ठिकाणच्या घरफोडीत च्या बाबत फिर्यादि न आल्याने त्या बाबत माहिती मिळाली नाही, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली . महामार्गालगत असलेले परिसर व हॉटेल , बंगलो आदि सह शहरात रात्री दररोज पोलीस पथक गस्त घालीत असुन हि नागरीकांनी सावध भुमिका घ्यावी असे असतांना हि आपसी माहिती द्वारे कोणीहि अज्ञात स्थानीक माहिती घेत घरफोडी किंवा लुबाडण्याचा प्रकार होत असेल तर नागरीकांनी आज्ञात हेरगीरी करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलीसांना द्यावी असे आवाहन पाेलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी केले आहे .

या घटनेतील फरार अरोपींचा शोध घेण्या साठी पोलीसांनी घटनास्थळी पंचनामा करीत अज्ञात चोरांबाबत पुरावे तपासले असता त्या वरून पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांच्या मार्गदर्शना खाली सहा . पोलीस निरीक्षक एस . टि . राखोंडे , पोलीस कर्मचारी सचिन देसले , गोपनिय पोलीस निलेश देवराज , आदि पोलीस पथक तपास करीत आहे .

हे सुद्धा वाचा

मध्यरात्री चोरी घरफोडी सारखे प्रकार घडत असतील तर नागरीकांनी सावध भुमिका घेत घरातील किमंती वस्तु , रोख रक्कमा आदि मुद्देमाल बँक लॉकर मध्ये सुरक्षीत ठेवल्या पाहीजे . आपल्या घरातील खाजगी विषय कोणाकडे चर्चा न करता आपली खबरदारी घ्यावी हया घरफोडीचा प्रकार अशाच घटनेतुन झाला असल्याचे पोलीस निरीक्षक पथवे म्हणाले . या घटनेचा तपास लवकरच लागेल असेहि पथवे म्हणाले .