Nashik Kumbh Mela 2026 : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुहूर्त ठरला! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण, संपूर्ण वेळापत्रक आलं
दर 12 वर्षांनी भरणाऱ्या नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा नेमका कधी आणि किती वाजता होणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक.

गेली अनेक दिवस नाशिक कुंभमेळाची भाविकांना प्रतिक्षा होती. गंगा गोदावरीच्या सहवासाने पावन झालेल्या त्र्यंबकेश्वरच्या भूमीमध्ये सिंहस्थ महाकुंभ पार पडणार आहे. दर बारा वर्षांनी होणाऱ्या भक्तीच्या आणि साधनेच्या आणि परंपरेच्या या विराट उत्सवाला आता आरंभ होत आहे. या महाकुंभाचे संपूर्ण वेळापत्रक आता समोर आले आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते सिंहस्त महाकुंभमेळ्याचा ध्वजारोहण आणि ध्वजस्तंभ पूजन सोहळा हा शनिवार ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पार पडणार आहे. ध्वजारोहण दुपारी ठिक १२ वाजून २ मिनिटांनी पार पडणार आहे. तर ध्वजस्तंभ पूजन ठिक दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी कुशावर्त तीर्थ (राम तीर्थ) याठिकाणी पार पडेल. या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांच्या उपस्थिती लाभणार आहे.
दरम्यान, ध्वजारोहण सोहळ्यासाठी दोन तासांपूर्वी मान्यवरांनी आसनावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर गोदा महाआरती होणार आहे. महाआरतीची वेळ सायंकाळी ६.३० वाजताची ठरवण्यात आली आहे. आरतीसाठीही ४.३० पूर्वी आसनस्थ होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी
ठिकाण – रामकुंड, पंचवटी
पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान – ११ सप्टेंबर २०२७
त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अमृत स्नानाच्या तारखा –
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ध्वजारोहण करुन कुंभ पर्वाला सुरुवात होईल.
पहिले अमृतस्नान – २ ऑगस्ट २०२७
द्वितीय अमृतस्नान – ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय अमृतस्नान – १२ सप्टेंबर २०२७
श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ, नाशिक
अखिल भारतीय वैष्णव आखाडा परिषद सिंहस्थ कुंभमेळा नाशिक २०२६-२७-२८ –
– सिंहस्थ ध्वजारोहण शुभारंभ
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी
ठिकाण – रामकुंड, पंचवटी
– ध्वज अवतरण – पर्वकाल समात्पी
सोमवारी, २४ जुलै २०२८ रोजी, दुपारी १ वाजून ३६ मिनिटांनी