नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 15 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार

| Updated on: Oct 26, 2021 | 12:38 PM

महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण नाशिक महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 15 हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नाशिकः महापालिकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. कारण नाशिक महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

नाशिक महापालिकेत जवळपास पाच हजार कर्मचारी आहेत. त्यांना जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपयांचा बोनस मिळावा अशी मागणी साऱ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. मात्र, एकीकडे आधीच महापालिका आर्थिक संकटात आहे. ते पाहता या कर्मचाऱ्यांना पंधरा हजारांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली आहे. महापालिका आस्थापनेवरील गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील कर्मचाऱ्यांत अंगणवाडी सेविका, मदतनीस, सफाई कामगार यांना हे सानुग्रह अनुदान मिळेल. गट ‘क’ मधील सातव्या वेतन आयोगाच्या लेव्हल – 15 आणि त्यापेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सानुग्रह अनुदान लाभ मिळेल. सोबतच ज्या कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतनमधील बँडमधील वेतनश्रेणी ही 9300-34,800 व ग्रेड पे 4400 रुपयांपेक्षा कमी वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हे अनुदान मिळेल. गेल्या वर्षीच्या दिवाळीनंतर मानधनावर कार्यरत असणारे अंगणवाडी कर्मचारी, मानधनावर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ कार्यरत असणारे कर्मचारी यांनाही सानुग्रह अनुदान मिळेल. त्यात कोरोना काळात जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साडेसात हजार रुपये मानधन आणि शासन अनुदानातून मानधन वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही साडेसात हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.

नोकर भरती होणार

महापालिकेची शुक्रवारी महासभा आहे. सत्ताधारी भाजपकडे अजूनही दोन-तीन महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. ते पाहता याचा फायदा घेण्यासाठी भाजपने पुरता जोर लावला असून, निवडणुकीच्या तोंडावर जंबो नोकर भरती करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सभेत ठेवला आहे. सोबतच महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवरच आयटी हब साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी महापौरांनी दिंडोरी येथील जागेसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याबाबतच्या अडचणी पाहता आता शहरातीलच एका महापालिकेच्या जागेवर आयटी हब उभारण्यात येणार आहे.

महापौरांचा दुजोरा

नाशिकमध्ये लॉजिस्टिक पार्कसाठी जागा देण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी केले होते. त्यानुसार आम्ही जागा शोधल्या आहेत. महापालिकेची शुक्रवारी सभा होणार असून, या सभेत यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिवाय नोकर भरती करण्याचा विचारही सुरू आहे. त्यालाही या सभेत मंजुरी मिळेल. शिवाय महापालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महापौर सतीश कुलकर्णी यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली.

इतर बातम्याः

ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाशिक महापालिकेत नोकर भरतीचा बार; आयटी हब, लॉजिस्टिक पार्कसाठी जोर

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर