गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर

पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांचे एकेक काळे कारनामे आता उघड होत असून, त्यांनी तब्बल 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमीन खरेदीसाठी गुंतवल्याचे उघकीस येत आहे.

गब्बर कांदा व्यापाऱ्यांचे कारनामेः 100 कोटींचा ब्लॅकमनी जमीन खरेदीत, नाशिकमधले 26 जण रडारवर
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांकडे सापडलेला काळा पैसा.


नाशिकः पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापाऱ्यांचे एकेक काळे कारनामे आता उघड होत असून, त्यांनी तब्बल 100 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जमीन खरेदीसाठी गुंतवल्याचे उघकीस येत आहे.

केंद्र सरकारच्या आयकर विभागाच्या वतीने पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीतील 6 कांदा व्यापाऱ्यांच्या 13 ठिकाणी गुरुवारी छापे टाकण्यात आले होते. सुमारे दीडशे ते दोनशे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या व्यापाऱ्यांचे कार्यालय आणि बँक खात्यांची तपासणी केली. आयकर विभागाने रोख रक्कमही जप्त केली. हा पैसा मोजण्यासाठी तब्बल ऐंशी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, पिंपळगावमधील बँकामध्ये जवळपास अठरा तास रोकड मोजली. सुरुवातीला हे छापासत्र कांद्याचे भाव कमी करण्यासाठी असल्याची चर्चा होती. मात्र, ती खोटी ठरल्याचे समोर येत आहे.

कारवाईवर माजी आमदारांचा आक्षेप

पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांवर आयकर विभागाने कारवाई केली. या कारवाईवर माजी आमदार मारोतराव पवार यांनी आक्षेप घेतला आहे. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात. शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे जास्त येतात, तेव्हाच अशी कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला होता. या वर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यात आयकरने कारवाई केली. त्यामुळे कांद्याच्या भावात हजार ते दीड हजाराची घसरण केली. आपण कुठल्याही नियमबाह्य कामाचे समर्थन करणार नाही. मात्र, केवळ दरवाढ झाल्यावरच छापेमारी करणे योग्य नाही. ही कारवाई थांबवावी, अशी मागणी त्यांनी होती.

अनेक धक्कादायक बाबी उघड

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) या छापासत्राबाबत सोमवारी नवी दिल्लीत माहिती दिली. त्यानुसार ज्या व्यापाऱ्यांवर छापे पडले आहेत, त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे. त्यांनी हा काळा पैसा जमीन खरेदीमध्ये गुंतवल्याचे समोर आल्याचे म्हटले आहे. विशेषतः जोपूळ रोडवरील एका भूखंड खरेदीमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे समोर येत आहे ही सारी उलाढाल बेहिशेबी मालमत्तेतून झाली असून त्यात कांद्यासह काही गब्बर द्राक्ष व्यापाऱ्यांचा सहभाग आढळून आला आहे.

26 व्यापारी रडारवर

आयकर विभागाच्या रडारवर एकूण 26 व्यापारी असल्याचे समजते. या व्यापाऱ्यांकडे अफाट माया आहे. त्यांनी हा काळा पैसा कशात गुंतवला, त्याचा तपास सुरू आहे. एकंदर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाची माहिती पाहता आगामी काळात अनेकजण या तपासामध्ये गुंतू शकतात किंवा आयकर पुन्हा एकदा छापासत्र अवलंबू शकते.

इतर बातम्याः

‘मविआ’च्या शिल्पाची काळजी घ्यावी, मी सेना मोठी केली, तेव्हा राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा षटकार, नांदगावबद्दल पवारांशी बोलणार

ठरलं! साहित्य संमेलन 3 डिसेंबरपासूनच, नाशिकच्या भुजबळ नॉलेज सिटीमध्ये सोहळा!!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI