AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशात या हिंदू व्यक्तीला थेट मंत्रिपद, तारिक रहमान यांच्या कॅबिनेटमध्ये मानाचं स्थान; नेमकं नाव काय?

Bangladesh Government : बांगलादेशमधील नवीन तारिक रहमान यांच्या सरकारमध्ये एका हिंदू व्यक्तीचा समावेश होण्याची शक्यता आहे. हा नेता कोण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बांगलादेशात या हिंदू व्यक्तीला थेट मंत्रिपद, तारिक रहमान यांच्या कॅबिनेटमध्ये मानाचं स्थान; नेमकं नाव काय?
Bangladesh hindu ministerImage Credit source: Google
| Updated on: Feb 16, 2026 | 4:01 PM
Share

बांगलादेशमध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बहुमत मिळवले आहे. आता 17 फेब्रुवारीला तारिक रहमान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत काही मंत्र्यांचाही शपथविधी होण्याची शक्यता आहे. तारिक रहमान यांच्या सरकारमध्ये एका हिंदू व्यक्तीचा समावेश होण्याची शक्यता आहे. बीएनपी पार्टीकडून यंदा फक्त दोन खासदार निवडून आले आहेत. यातील गोयेश्वर चंद्र रॉय यांनी मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. गोयेश्वर चंद्र रॉय हे कोण आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

तारिक रहमान यांच्या मंत्रिमंडळात 40 मंत्री असणार

द डेली स्टारने दिलेल्या बातमीनुसार तारिक रहमान यांच्या नवीन मंत्रिमंडळात 40 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. यात काही नवीन आणि काही जुन्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यात मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर, सलाहुद्दीन चौधरी, मिर्झा अब्बास, हाफिज उद्दीन अहमद, अमीर खोसरू महमूद चौधरी आणि अब्दुल मोईन खान यांची नावे मंत्रि‍पदासाठी निश्चित मानली जात आहेत. या मंत्र्यांनी पूर्वी खालिदा झिया यांच्या सरकारमध्ये काम केलेले आहे.

गोयेश्वर चंद्र रॉय यांनी मंत्रिपद मिळणार

वरील जुन्या सहकाऱ्यांसह तारिक रहमान हे आपल्या मंत्रिमंडळात काही नवीन चेहरे समाविष्ट करणार आहेत. यामध्ये प्रमुख नावे म्हणजे शमा उबैद, अफरोजा खानम रीता आणि बॅरिस्टर फरजाना शर्मीन पुतुल यांचा समावेश आहे. हिंदू समुदायातील गोयेश्वर चंद्र रॉय यांनी मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तारिक यांच्या मंत्रिमंडळात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश असणार आहे.

गोयेश्वर चंद्र रॉय कोण आहेत?

गोयेश्वर चंद्र रॉय हे 1978 पासून बीएनपीचे सदस्य आहेत. तसेच ते बीएनपीच्या धोरण-निर्धारण समितीचे प्रमुख आहेत. गोयेश्वर यांचे खालेदा कुटुंबाशी दीर्घकाळ संबंध आहेत. गोयेश्वर चंद्र रॉय यांनी ढाका-3 मधून विजय मिळवला आहे. गोयेश्वर यांनी खालेदा झिया यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केलेले आहे. गोयेश्वर यांचे मेहुणे नितोय रॉय चौधरी हे देखील बीएनपीकडून निवडणूक जिंकले आहेत. मात्र चौधरी यांच्या ऐवजी गोणेश्वर रॉय यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?
अजित पवारांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्था करणार?.
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा
आम्ही उठाव केला नसता तर मंत्रीपद मिळालं नसतं; शिंदेंचा नाईकांना इशारा.
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?
अजितदादांच्या निधानानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांना भविष्याची चिंता?.