AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Recruitment 2026 : बँकेत 2273 जागांसाठी मेगाभरती, शिक्षणापासून पगारपर्यंत A टू Z माहिती, अर्ज कसा कराल?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये २२७३ सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची मुदत २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढली असून महाराष्ट्र आणि मुंबई मेट्रोसाठी ३३० हून अधिक जागा आहेत. सविस्तर माहितीसाठी वाचा.

SBI Recruitment 2026 : बँकेत 2273 जागांसाठी मेगाभरती, शिक्षणापासून पगारपर्यंत A टू Z माहिती, अर्ज कसा कराल?
sbi
| Updated on: Feb 16, 2026 | 3:53 PM
Share

बँकिंग क्षेत्रात आपले करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर तरुणांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या एसबीआयमध्ये ‘सर्कल बेस्ड ऑफिसर’ (CBO) पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. या अर्जांसाठी १८ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र उमेदवारांचा वाढता उत्साह आणि तांत्रिक बाबींचा विचार करून बँकेने आता ही मुदत २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे अनेकांसाठी ही करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची उत्तम संधी मानली जात आहे.

एकूण २२७३ जागांची भरती

या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील विविध सर्कल्समध्ये एकूण २२७३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात २०५० नियमित पदे (Regular Vacancies) असून २२३ पदे मागील वर्षांतील शिल्लक (Backlog) आहेत.

विभागांनुसार (Circle-wise) रिक्त पदे

या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध आहेत. सध्या महाराष्ट्र सर्कल १९४ पदे रिक्त आहेत, त्यांच्यासाठी ही भरती केली जाणार आहे. मुंबई मेट्रो सर्कल (मुंबई आणि गोवा) – १४३ पदे रिक्त आहेत. त्यापाठोपाठ अहमदाबाद (२००), बंगळुरू (३००), भोपाळ (१५०), चंदीगड (२५०), चेन्नई (२००), उत्तर पूर्व (१७५), हैदराबाद (५०), जयपूर (१००), कोलकाता (२००), लखनऊ (५०) आणि नवी दिल्ली (७०) यांसह एकूण १६ सर्कल्समध्ये ही भरती होत आहे.

पात्रतेचे निकष काय आहेत?

  • शिक्षण: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) उमेदवार अर्ज करू शकतात. वैद्यकीय, अभियांत्रिकी, चार्टर्ड अकाउंटंट (CA) अशा पदवीधारकांनाही या पदासाठी संधी आहे.
  • अनुभव: ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत, उमेदवाराला कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँकेत किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत (RRB) अधिकारी म्हणून किमान २ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय २१ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे (३१ डिसेंबर २०२५ रोजी). सरकारी नियमांनुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • भाषा: उमेदवार ज्या सर्कलसाठी अर्ज करत आहे, तिथल्या स्थानिक भाषेचे (उदा. महाराष्ट्रासाठी मराठी) ज्ञान असणे अनिवार्य आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल. सुरुवातीला मार्च २०२६ मध्ये ऑनलाईन लेखी परीक्षा (Objective + Descriptive) घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील (Screening) आणि त्यानंतर मुलाखत व स्थानिक भाषा चाचणी घेतली जाईल.

अर्ज कसा कराल?

जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर (sbi.bank.in/web/careers) जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी ७५० रुपये शुल्क असून, अनुसूचित जाती, जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य आहे.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ