AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..

Maharashtra Rain Update : राज्यात आज पावसाचा इशारा काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आला. शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. त्यामध्येच अनेक भागात रात्री पाऊस झाला असून सकाळीही ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. राज्यात पुन्हा मॉन्सून सक्रिय झाला.

Maharashtra Rain Update : राज्यात धो धो पाऊस, तब्बल इतक्या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस, 24 तासात..
Maharashtra Rain
| Updated on: Jul 15, 2026 | 7:11 AM
Share

राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली. त्यामध्येच आज काही भागात पाऊस झाला. अरबी समुद्रात अफगाणिस्तानकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे मॉन्सून पुढे प्रगती करू शकत नव्हता. आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या जरी बरसण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. जम्मू, डेहराडून, पटना ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात काही भागात उष्णता वाढताना दिसली. राज्यात 20 जुलैनंतर पुन्हा एकदा पूर्ण मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला.

रायगड, पुणे, बीड, ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, सातारा घाटमाथा, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात विजांच्या कडकाटाडासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या असून मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने आज मोठा इशारा दिला. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पुणे शहरावरील पाणी कपात तूर्तास टळली आहे. पाणी कपात महापौरांकडून रद्द करण्यात आली. एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा होता पालिकेचा विचार. मात्र,गेल्या काही दिवसात खडकवासला धरण साखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने खडकवासला धरण साखळी सध्या 58% पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्यातरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

अकोला जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून भर पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही अनेक भागांत पुरेसा पाऊस न झाल्याने सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्याच्या एकूण पावसाची आकडेवारी सामान्य श्रेणीत दिसत असली तरी अनेक भागांत पावसाचे असमान वितरण झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचा आधार घ्यावा लागत आहे. शेतकरी पावसाची वाट पाहात आहेत.

Follow Us
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....
पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना...
Devendra Fadnavis On SIR : पारदर्शक मतदार यादी हवी, तर... फडणवीसांनी एक्स पोस्ट करत विरोधकांना केला सवाल
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय...
तर साखर कारखाने बंद पडतील, राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा; नेमकं काय घडतंय?
मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला..
Maharashtra Voter List : मतदारांची नावे वगळल्याचं प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात; निवडणूक आयोगाला नोटीस अन्...