AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील…

गणपती रेल्वे आरक्षणात ओपनिंग कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळताना मारामार होत आहे. या तिकीटांच्या आरक्षण प्रणालीत पारदर्शकात एक सूत्रीकरण दिसत नाही.त्याची थोडक्यात माहिती...

गणेशोत्सवासाठीचे नियमित रेल्वे गाड्यांचे बुकींग फुल, कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी, चाकरमानी हवालदील...
| Updated on: Jul 15, 2026 | 12:30 AM
Share

गणेशोत्सवासाठी चाकरमानी आपल्या गावी कोकणात गणेश चतुर्थीच्या दोन ते दिन दिवस आधी जातात. कोकणात रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दरवर्षी रेल्वे जादा गाड्या सोडत असते. यंदा कोकण मार्गावरील नियमित रेल्वे गाड्यांचे आरक्षण १३ जुलै पासून सुरु झाले आहे. यंदा नियमित गाड्यांचे आरक्षण सुरु होताच अवघ्या काही मिनिटांत फुल झाले आहे. अनेक महत्वाच्या गाड्यांची वेटिंग लिस्ट फुल झाली असून हाती भलीमोठी प्रतिक्षायादी पडत आहे. गणपती रेल्वे आरक्षणात ओपनिंग कोटा कमी आणि दलालांची घुसखोरी यामुळे प्रवाशांना तिकीट मिळत नाही.

पारदर्शकता एकसूत्रीपणा नाही…

मुळात रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संख्येप्रमाणे,त्या एका डब्याच्या बर्थच्या संख्येप्रमाणे एकूण बर्थची संख्या आणि प्रत्यक्षात आरक्षणाच्या वेळी उपलब्ध बर्थची संख्या फारच कमी असते त्यामुळे काही सेकंदात तिकीट बुक करताना रिग्रेट असा संदेश येतो. उदा. 20111 मुंबई मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये एकूण सर्व बर्थ 1069 आहेत. पण प्रत्यक्षात 469 बर्थचेच आरक्षण उपलब्ध असते.उरलेले VIP आणि तत्काळ बुकिंगसाठी राखीव असावे.पण मुद्दा हा आहे की असा राखीव कोटा एकूण बर्थच्या किती टक्के असतो ते स्पष्ट केलेले नाही. रिग्रेट होते वेळी नक्की शेवटचे वेटींग तिकीट किती असते 200, 300, 400 हे देखील स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या रेल्वे आरक्षणात आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय असेच दिसत अशी प्रतिक्रीया प्रवासी बळीराम राणे यांनी दिली आहे.

पुढील आरक्षण कधी आणि किती तारखेला…

गणेश चतुर्थीला कोकण रेल्वे मार्गावर कोकणकन्यासह अन्य नियमित धावणाऱ्या ट्रेनचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू झालेले आहे. तसेच गौरीच्या आगमनाला जाणाऱ्या कोकणवासीयांची संख्याही मोठी आहे. यंदा १७ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन आणि १८ सप्टेंबरला गौरीपूजन आहे. या १७ सप्टेंबरला सुटणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण १९ जुलै रोजी होणार आहे.

बाप्पाच्या आगमनाची ओढ चाकरमान्यांना लागली आहे. कोकणात किंवा गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वे आरक्षणाचे वेळापत्रक आले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगच्या या महत्त्वाच्या तारखा नक्की लक्षात ठेवा!

आरक्षण रोज सकाळी ठीक ८:०० वाजता सुरू होईल.

प्रवासाची तारीख ➡️ आरक्षण सुरू होण्याची तारीख:

११ सप्टेंबर (शुक्रवार) ➡️ १३ जुलै २०२६

१२ सप्टेंबर (शनिवार) ➡️ १४ जुलै २०२६

१३ सप्टेंबर (रविवार) ➡️ १५ जुलै २०२६

१४ सप्टेंबर (सोमवार – गणेश चतुर्थी) ➡️ १६ जुलै २०२६

१५ सप्टेंबर (मंगळवार) ➡️ १७ जुलै २०२६

१६ सप्टेंबर (बुधवार) ➡️ १८ जुलै २०२६

१७ सप्टेंबर (गुरुवार) ➡️ १९ जुलै २०२६

१८ सप्टेंबर (शुक्रवार) ➡️ २० जुलै २०२६

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप