AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुभाष चंद्रा यांच्या कर्जमाफीला LIC, युनियन बँकेचा थेट विरोध, NCLAT मध्ये अपील करण्याचा निर्णय! 

22 हजार कोटींच्या दाव्याच्या तुलनेत केवळ 6.25 कोटी रुपयांची रक्कम मिळणार असल्याने हा सेटलमेंट प्लान योग्य आहे का, यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

सुभाष चंद्रा यांच्या कर्जमाफीला LIC, युनियन बँकेचा थेट विरोध, NCLAT मध्ये अपील करण्याचा निर्णय! 
SUBHASH CHANDRA AND UNION BANK LICImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 3:59 PM
Share

Subhash Chandra Bank Loan : उद्योगपती सुभाष चंद्रा यांच्याशी संबंधित तब्बल 22 हजार कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. दिल्लीतील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) एस्सेल ग्रुपच्या कंपन्यांच्या कर्जाच्या सेटलमेंटला मंजुरी दिल्यानंतर काही मोठ्या वित्तीय संस्थांनी या निर्णयाला विरोध केला आहे. HDFC बँक आणि LIC हाउसिंग फायनान्सने (LICHFL) या निर्णयाविरोधात नॅशनल कंपनी लॉ अपीलेट ट्रिब्युनलचा (NCLAT) दरवाजा ठोठावण्याची तयारी सुरू केली आहे. तसे अधिकृतपणे या दोन्ही वित्तीय संस्थांनी सांगितले आहे.

मंगळवारी NCLTने सुभाष चंद्रा यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या परतफेड योजनेला मंजुरी दिली. एस्सेल ग्रुपशी संबंधित कंपन्यांवर एकूण २२,००६ कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे या प्रकरणात समोर आले आहे. या कर्जासाठी सुभाष चंद्रा यांनी वैयक्तिक हमीदार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.

मंजूर करण्यात आलेल्या सेटलमेंटनुसार, मुख्य कर्जदारांकडून सुमारे 1494 कोटी रुपये वसूल केले जाऊ शकतात. तर वैयक्तिक हमीदार म्हणून सुभाष चंद्रा यांच्याकडून केवळ 6.25 कोटी रुपयांचीच वसुली केली जाणार आहे. याच मुद्द्यावर काही बँका आणि वित्तीय संस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

या सेटलमेंटला विरोध करणाऱ्या संस्थांमध्ये LIC हाउसिंग फायनान्स, HDFC बँक, अॅक्सिस बँक, कॅनरा बँक, RBL बँक आणि युनियन बँक यांचा समावेश आहे. HDFC बँकेने या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट केले असून, आता NCLATमध्ये अपील करण्याबाबत बँक कायदेशीर पर्याय तपासत आहे.  एचडीएफसी बँकेप्रमाणेच यूनियन बँकेनेही कर्जाच्या या सेटलमेंटला विरोध केला असून थेट NCLATमध्ये  आम्ही अपील करणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान, LIC हाउसिंग फायनान्सनेही NCLATमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या प्रकरणात नॅशनल हाउसिंग बँकेकडे (NHB) हस्तक्षेपाची मागणी करण्याची शक्यता आहे.

22 हजार कोटींच्या दाव्याच्या तुलनेत केवळ 6.25 कोटी रुपयांची रक्कम मिळणार असल्याने हा सेटलमेंट प्लान योग्य आहे का, यावरून आता वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे NCLAT या प्रकरणात काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम