बळीराजाचा अपघाती मृत्यू, जिल्ह्यात हळहळ, दोन पैसे अधिक मिळवण्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता, पण…

| Updated on: Mar 31, 2023 | 3:07 PM

कांद्याला योग्य मिळत नसल्याने बळीराजा चिंतेत असताना नाशिकच्या नांदगाव येथील एका शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बळीराजाचा अपघाती मृत्यू, जिल्ह्यात हळहळ, दोन पैसे अधिक मिळवण्यासाठी तो रात्रीचा दिवस करत होता, पण...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : राज्यात सध्या अपघातांचे सत्र वाढत चालले आहे. त्यामध्ये अपघात झाल्यानंतर अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. नुकताच नांदगाव मध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. दुर्दैवाने एका शेतकऱ्याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव रस्त्यावर हा अपघात घडला आहे. जळगाव खुर्द गावाजवळ हा अपघात झाला आहे. त्यामध्ये मृत्यू झालेल्या शेतकाऱ्याचे नाव एकनाथ सोनवणे असं आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या मालाला दोन पैसे अधिक मिळावे याकरिता रात्रीच बाजारसमितीत नंबर लावण्यासाठी जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला योग्य भाव द्या आणि अनुदान वाढवून द्या अशी मागणी केली जात असतांना शेतमाल विकून त्यातून दोन पैसे अधिक कसे मिळतील याचा प्रयत्न करत आहे. त्याच दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे रात्रीच्या वेळेलाच बाजार समितीत नंबर लावतात. कांद्याचा ट्रॅक्टर घेऊन जणाऱ्यांची संख्या यामध्ये अधिक आहे. त्याप्रमाणे मृत्यू झालेले शेतकरी एकनाथ सोनवणे हे हिंगणे देहेरे या गावातून नांदगाव शहरात असलेल्या बाजारसमितीत येत होते.

हे सुद्धा वाचा

त्याच दरम्यान प्रवास सुरू असतांना चाळीसगावच्या दिशेने येणाऱ्या मालवाहू पीकअपने धडक दिल्याने त्यामध्ये एकनाथ सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने जिल्ह्यातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सातत्याने कांद्याच्या भावात घसरण होत असल्याने लवकर नंबर लागून दोन पैसे अधिकचे मिळतील यासाठी धडपड करत असतात. त्यासाठी काही शेतकरी रात्रीच बाजारसमिती गाठून नंबर लावत असतात. याच लगबगीत शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

रात्रीच्या वेळेला शक्यतोवर प्रवास टाळावा असे अनेकदा सांगितले जाते. तरीही अनेक जण रात्रीचा प्रवास करतात. त्यामुळे अपघात झाल्यानंतर मदत होत नाही. अनेकदा यामध्ये झोप लागल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्याची वेळ वारंवार येते.

नांदगाव पोलिस ठाण्यात याबाबत मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिकचा तपास केला जात आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे. त्यासाठी भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.