कोरोनाची चित्तरकथा; चीन-इंग्लंडमध्ये धोक्याची घंटा, तर नाशिकला पावणेदोन वर्षांनी दिलासा!

| Updated on: Mar 16, 2022 | 1:02 PM

नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी 16 मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 967 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 20 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची चित्तरकथा; चीन-इंग्लंडमध्ये धोक्याची घंटा, तर नाशिकला पावणेदोन वर्षांनी दिलासा!
Corona patients
Follow us on

नाशिकः चीननंतर (China) आता इंग्लंडमध्येही (England) कोरोना (Corona) रुग्णांमध्ये पुन्हा एका चक्क 77 टक्क्यांची अचानक वाढ झालीय. जगातील इतर देशांमध्येही कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. अनेक जण ही धोक्याची घंटा असल्याचे म्हणतायत. मात्र, नाशिक जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या आणि मृत्यूही एकदम घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पावणेदोन वर्षानंतर मंगळवारी प्रथमच नाशिकमध्ये एकही रुग्ण नोंदवला गेला नाही. पंधरा दिवसांत पहिल्यांदाच मृत्यूचे प्रमाणही शून्यावर आले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज बुधवारी 16 मार्च रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 66 हजार 967 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 20 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

सध्या कुठे आहेत रुग्ण?

सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये उपचार सुरू असलेले रुग्ण हे ग्रामीण भागात नाशिकमध्ये 2, बागलाण 1, चांदवड 2, देवळा 3, दिंडोरी 2, इगतपुरी 0, कळवण 2, मालेगाव 0, नांदगाव 1, निफाड 7, पेठ 4, सिन्नर 1, सुरगाणा 0, त्र्यंबकेश्वर 2, येवला 0 अशा एकूण 27 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 59, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 1 तर जिल्ह्याबाहेरील 2 रुग्ण असून असे एकूण 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 75 हजार 955 रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी किती?

नाशिक जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मध्ये 97.55 टक्के, नाशिक शहरात 98.47 टक्के, मालेगावमध्ये 97.37 टक्के, तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 98.46 टक्के असून, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के इतके आहे. कोरोनामुळे नाशिक जिल्ह्यातील ग्रामीणभागात आतापर्यंत 4 हजार 304 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 105, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 899 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आहे जिल्ह्याचे चित्र

– एकूण कोरोनाबाधित 4 लाख 75 हजार 966.

– 4 लाख 66 हजार 967 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यानेडिस्चार्ज.

– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 89 पॉझिटिव्ह रुग्ण.

– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

Video | ‘अभिव्यक्ती’ म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नव्हे, संविधानाचा गैरअर्थ नको; उज्ज्वल निकमांकडून कोर्टाचे स्वागत