मैदान संजय राऊत यांचं, पण रश्मी ठाकरे गाजवणार; पक्षातील पडझड रोखण्यासाठी कुठे आणि कधी होणार मेळावा?

| Updated on: Apr 13, 2023 | 8:56 AM

शिवसेना ठाकरे गटाला महिला आघाडीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्या जय महाराष्ट्र करीत शिवसेना शिंदे गटात दाखल होत असल्यानं रश्मी ठाकरे मैदानात उतरणार आहे.

मैदान संजय राऊत यांचं, पण रश्मी ठाकरे गाजवणार; पक्षातील पडझड रोखण्यासाठी कुठे आणि कधी होणार मेळावा?
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आणि त्यानंतर ठाकरेंना सोडून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत होते. संपूर्ण महाराष्ट्रात असं चित्र असतांना नाशिकमध्ये वेगळं चित्र होतं. नाशिकचे दोन आमदार आणि एक खासदार शिंदेच्या शिवसेनेत गेले असले तरी दुसरीकडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटातकह होते. मात्र, त्यानंतर काही महिन्यांनी हळूहळू पदाधिकारी देखील शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होऊ लागले. त्यानंतर कार्यकर्ते जाऊ लागले आहे. यामध्ये महिलांची देखील मोठी फळी ठाकरेंना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाल्याने मोठा धक्का खरंतर शिवसेना ठाकरे गटाला बसला होता. यामध्ये थेट संजय राऊत यांनाच एकप्रकारे धक्का मानला जात आहे.

महिला आघाडीत खरंतर मोठे चेहरे नाशिकमध्ये नाही. त्यात माजी नगरसेविकाच नाशिकची महिला आघाडी सांभाळत होत्या. त्यात आता मागील महिण्यात काही महिलांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. त्यामुळे संजय राऊत यांना धक्का दिल्याचे बोलले जात आहे.

हीच महिला आघाडी पुन्हा बळकट करण्यासाठी आता संजय राऊत यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये रश्मी ठाकरे स्वतः मेळावे घेणार आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे मैदान गाजवणार आहे. त्यामुळे रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याची जोरदार तयारी केली आहे.

हे सुद्धा वाचा

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रश्मी ठाकरे या नाशिक शहरात महिला मेळावा घेणार आहे. खरंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे यांचा नाशिकला मेळावा होणार असल्याने जोरदार तयारी केली जात आहे. पक्षातील पडझड रोखण्यासाठी रश्मी ठाकरे यांच्या मेळाव्याला किती यश येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

खासदार संजय राऊत यांच्याकडे खरंतर उत्तर महाराष्ट्राच्या संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू नेते असतांना पक्षात पडझड सुरू आहे. ती रोखण्यात यश येत नाहीये. आणि त्याच धर्तीवर आता रश्मी ठाकरे या मैदानात उतरल्या असून मेळावा घेणार आहे.

खरंतर ज्या दिवशी संजय राऊत यांचा नाशिकदौरा असतो. त्याच वेळेला नाशिकमधील पदाधिकारी किंवा कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असतात. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेकडून शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का दिला जात आहे. त्यामुळे हेच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी रश्मी ठाकरे यांना यश मिळतं का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागू आहे.