छगन भुजबळ यांना घरातूनच कडवे आव्हान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केला विरोधात पॅनल, राजकारण तापलं

राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी छगन भुजबळ यांचे टेंशन वाढवलं आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पॅनल करण्यात आल्यानं उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

छगन भुजबळ यांना घरातूनच कडवे आव्हान, राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच केला विरोधात पॅनल, राजकारण तापलं
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 17, 2023 | 2:44 PM

लासलगाव, नाशिक : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांचं त्यांच्याच पदाढीकऱ्यांनी टेंशन वाढवलं आहे. भुजबळांच्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील लासलगाव बाजार समितीची निवडणूक ऐन रंगात आली आहे. आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजार पेठे म्हणून ओळख लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. 28 एप्रिल 2022 ला पंचवार्षिक निवडणूक होत आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. ही निवडणूक बिनविरोध न झाल्यास पैशांचा खेळ होण्याची भीती माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. यानंतर बाजार समितीच्या वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

कांदा म्हटले की आपसूकच नाव येणार ते लासलगावचे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची कांदा, धान्य, भाजीपाला आणि जनावरे लिलावाची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींच्या जवळपास आहे. एकोणीस कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. या लासलगाव बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक 28 एप्रिल 2022 होत आहे.

या अगोदर 20 एप्रिल रोजी माघारी होणार आहे. त्या अगोदर इच्छुक उमेदवारांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या 65 गावांमध्ये आपला प्रचार दौरा सुरू केला आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक जयदत होळकर आणि पंढरीनाथ थोरे या दोन नेत्यांनी परस्पर विरोधी पॅनल तयार करण्याची लगबग सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा

माजी आमदार आणि बाजार समितीचे माजी सभापती कल्याणराव पाटील यांनी बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, या प्रयत्नाला यश येत नसल्याचे दिसत असल्याने या निवडणुकीतून थांबण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगत  यात मोठा पैसाचा खेळ होण्याची भीती व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक जयदत होळकर यांच्या पॅनलला छगन भुजबळ यांचा पाठिंबा असणार आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधी असलेला पॅनलचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे नेते पंढरीनाथ थोरे यांच्या पॅनलला पाठिंबा देणार असल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील म्हंटले आहे.

कल्याणराव पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र यानिमित्ताने तयार झाले आहे. तर दुसरीकडे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कल्याणराव पाटील यांच्या आरोपाचे खंडन करत निवडणुकीत थोडाफार खर्च येणारच असं म्हंटलं आहे.

छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची मोट बांधण्याचे काम केले असले तरी काही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाढीकऱ्यांनी भाजप साथ घेऊन पॅनल तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीच भुजबळ यांचे टेंशन वाढल्याचे बोलले जात आहे.

Non Stop LIVE Update
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.