ब्रम्हगिरी पर्वतावर दर्शनासाठी आलेल्या भविकावर काळाचा घाला, दर्शन करून उतरताना नेमकं काय घडलं?

| Updated on: May 03, 2023 | 10:49 AM

नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरी पर्वतावर अनुचित प्रकार घडला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड येथील भाविक दर्शनासाठी आलेले असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

ब्रम्हगिरी पर्वतावर दर्शनासाठी आलेल्या भविकावर काळाचा घाला, दर्शन करून उतरताना नेमकं काय घडलं?
Image Credit source: TV9 Network
Follow us on
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून भाविकांचा वाहनाला अपघात, दर्शनासाठी गेल्यावर पाय घसरून जखमी, अशा विविध दुर्दैवी घटना कानावर पडत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना नाशिकच्या ब्रम्हगिरी पर्वतावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. बीडच्या एका भविकाचा मृत्यू ब्रम्हगिरी पर्वतावर झाला आहे. खरंतर अनेक भाविक विविध भागातून येथे दर्शनसाठी येत असतात. तर काही भाविक हे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी आल्यानंतर ब्रम्हगिरी पर्वतावर दर्शनासाठी जातात. काही वर्षांपूर्वी अशीच दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अंगावर दगड कोसळून चार जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एका भविकाचा दरड कोसळूनच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
भानुदास आरडे असं मृत भाविकाचं नाव असून ते बीडचे रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. दर्शन करून खाली उतरत असताना ब्रम्हगुफेजवळ ५० किलोचा दगड अंगावर कोसळल्याने भाविकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
यापूर्वीही ब्रम्हगिरी पर्वतावर दरड कोसळून ४ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे ब्रम्हगिरी पर्वतावरील दरड कोसळल्याच्या घटना पाहता भाविकांनी दर्शनासाठी जात असतांना माहिती घेऊनच जाणं गरजेचे आहे.
नाशिकच्या ब्रम्हगिरी पर्वताच्या अनेक अआख्यायिका सांगितल्या जातात. अनेक भाविक दर्शनासाठी येथे येत असतात. मात्र, अचानक काही ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
खरंतर पर्यटन स्थळी जात असतांना अनेक भाविकांना स्थानिक परिस्थितीची कल्पना नसल्याने दुर्दैवी घटना घडत असतात. त्यामुळे बहुतांश वेळेला अपघात घडत असतात. त्यात काही भाविकांना आपले प्राण गमवावे लागतात.
भानुदास आरडे यांच्या अंगावर दरड कोसळून जखमी झाल्यानंतर बरोबरच्या काही लोकांनी आणि स्थानिक नागरिकांनी डोली करून त्यांना पायथ्याशी आणले होते. त्यांनंतर काही वेळाने त्यांनी सरकारी रुग्णालयात देखील नेले होते. मात्र, उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एकूणच