Nashik Crime : ऑफीसमधला टॅब चोरी, अश्लील व्हिडीओ अन् मोठा ट्विस्ट.. नाशिकमध्ये खरात प्रकरणाची पुनरावृत्ती

नाशिकमध्ये एका धक्कादायक सेक्स स्कँडलचा उलगडा झाला आहे. खंडणीची तक्रार करणाऱ्या व्यावसायिकावरच आता अनेक अधिक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. नोकरीचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्यासोबत गैरकृत्ये करून व्हिडिओ बनवून 'ब्ल्यू फिल्म' म्हणून विकत होता. अनेक पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचा समावेश आहे. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Nashik Crime : ऑफीसमधला टॅब चोरी, अश्लील व्हिडीओ अन् मोठा ट्विस्ट.. नाशिकमध्ये खरात प्रकरणाची पुनरावृत्ती
नाशिक क्राईम
| Updated on: Apr 04, 2026 | 8:12 AM

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर सातत्याने चर्चेत आहे. एकीकडे भोंदू अशोक खरातची केस गाजत असतानाच, नाशिकमध्ये नुकतच आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस आलं. मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी एका व्यावसायिकाला देण्यात आली होती. त्याच्या ऑफीसमधला टॅब चोरून, त्यातील महिलांचे नको ते व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी 4 संशयितांनी दिली होती. मात्र याप्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली असून मोठा ट्विस्ट आला आहे. खंडणी मागितल्याची तक्रार ज्या व्यावसायिकाने केली होती, त्याच्यावरही आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो फिर्यादीच आता आरोपी असल्याचं समजतंय.

काय आहे प्रकरण ?

नाशिकच्या सातपूर परिसरातील एक व्यावसायिक आहे, ज्याच्या ऑफीसमधून एक टॅब चोरीला गेला. चार लोकांनी तो टॅब चोरत, त्यामध्ये असलेले व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देत त्या लोकांनी संबंधित व्यावसायिकाकडे 12 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या रकमेपैकी 10 हजार रुपये घेत असताना, या 4 संशयितांना नाशिकच्या सातपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती समोर आली होती. चारही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशीही केली

मात्र जो स्वत: तक्रारदार आहे, त्या व्यावसायिकावरही पोलिसांना संशय होता. आता याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्याने टॅब चोरीला गेल्याची, खंडणी मागितल्याची तक्रार केली कारण तोच गुन्हेगार असल्याचं समोर आलं आहे. संबंधित व्यावसायिकानेच 100 हून अधिक महिलांच लैंगिक शोषण केली अशी माहिती समोर आली आहे.संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या टॅबमध्ये 87 व्हिडीओ सापडल्याने हे प्रकरण समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्डही जप्त करण्यात आलं आहे.

ब्लू फिल्म म्हणून विकायचा अश्लील व्हिडीओ ?

आरोपीने महिलांना नोकरीचं आमिष दाखवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी हा नाशिक, इगतपुरी येथील हॉटेलमध्ये अत्याचार करून त्या घाणेरड्या कृत्यांचं गुपचूप चित्रीकरण, रेकॉर्डिंग करायचा, एवढंच नव्हे तर तो त्या अश्लील व्हिडिओंची ‘ब्लू फिल्म’ म्हणून विक्री करत होता, असाही संशय आहे. या घटनेतील पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार व घरकाम करणाऱ्या महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बलॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का हेही तपासण्यात येत आहे. पीडितांमध्ये अनेक महिलांचा समावेश आहे. या आरोपीवर बलात्कार व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील इतर स्पॉट्स व लिंकचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या भयानक प्रकारामुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

 

Follow Us