Nashik Earthquake: मोठी बातमी! नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये घबराट

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Nashik Earthquake: मोठी बातमी! नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये घबराट
नाशिकमध्ये पुन्हा भूकंप
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 14, 2026 | 7:48 AM

मोठी बातमी समोर येत आहे, नाशिक पुन्हा एकदा भूकंपाने हादरलं आहे. नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 3.4 रिश्टल स्केल एवढ्या या भूकंपाची नोंद झाली आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पूर्वी देखील नाशिकमध्ये भूकपांचे धक्के जाणवले होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के ठरावीक अंतराने जाणवत आहेत.

दरम्यान ‘नाशिक आणि गुजरातच्या परिसरात भूगर्भात अनेक हालचाली सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमिनीत झिरपले आहे. टेक्टॉनिक प्लेट्स मध्ये मोठ्या हालचाली झाल्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. ठराविक अंतराने धक्के बसत आहेत ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे भूकंपाचा मोठा धक्का बसण्यापासून संरक्षण होते. आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या संदर्भातील आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे, अशी माहिती नाशिकचे भूकंप अभ्यासक डॉ.किरणकुमार जोहार यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यातही जाणवले होते भूकंपाचे धक्के

दरम्यान गेल्या आठवड्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास देखील नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाच्या धक्क्यामुळे जमीन हादरली काही घरात भांडे पडल्याच्या देखील घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.  शनिवारी रात्री जो भूकंप झाला त्याची नोंद 4,3 रिश्टल स्केल एवढी झाली होती.  नाशिक शहरातील इंदिरानगर परिसर, मेन रोड परिसर, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डी पाडा या परिसरात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले होते, तसेच ग्रामीण भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले.

दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा नाशिक भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे.  नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा 3.4 रिश्टल स्केल एवढ्या तीव्रतेचा भूंकप झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नाशिक आणि गुजरातच्या परिसरात भूगर्भात अनेक हालचाली सुरू आहेत, त्यामुळे भूकपांचे धक्के बसत असल्याचं मत भूकंप अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे.

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us