Nashik| ‘स्वाधार’साठी विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज; भोजन, निवासासह सर्व मोफत, काय आहे योजना?

| Updated on: Jan 10, 2022 | 7:05 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे.

Nashik| स्वाधारसाठी विद्यार्थ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज; भोजन, निवासासह सर्व मोफत, काय आहे योजना?
student
Follow us on

नाशिकः अनुसूचित जाती व नवबैद्ध प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रीकोत्तर शिक्षण व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी नाशिकच्या सहाय्यक समाज कल्याण आयुक्त कार्यालयातून विनामूल्य अर्ज घेवून जावे आणि योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.

काय आहे योजना?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2016-2017 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबैद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही, त्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे आणि याबरोबरच भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यामध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध करून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, नाशिक येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांनाही लाभ

या योजनेंकरीता 2020-2021 व 2021-2022 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार 22 डिसेंबर 2021 रोजीच्या शासनाच्या परिपत्रकान्वये या कालावधीत शाळा, महाविद्यालये बंद होती. यादरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले आहे. त्यांना देखील स्वाधार योजनेचा लाभ मिळण्याकरिता या शैक्षणिक वर्षासाठी पात्र ठरविण्यात आले असल्याचे कळवण्यात आले आहे. शिवाय या योजनेच्या अर्ज स्वीकृतीसाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे.

काय आहे पात्रता?

– विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
– विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, अशा स्थानिक ठिकाणचा रहिवासी नसावा.
– अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तीन टक्के आरक्षण. पात्रतेची किमान टक्केवारी 50 टक्के.
– दिव्यांग विद्यार्थी वगळता इतर विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 10 वी, 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण आवश्यक.
– विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा व कुटुंबाचे / पालकांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे.
– विद्यार्थ्यांने स्वत:च्या नावे राष्ट्रीयकृत / शेड्युल बँकेत खाते उघडणे व आधार क्रमांकाशी संलग्न करणे अनिवार्य आहे.
– विद्यार्थ्याने शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे इयत्ता 10 वी किंवा 12 वीनंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला असावा. त्यास कोणत्याही शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा.
– 12 वीनंतरच्या तसेच पदवीनंतर पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रम हा दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीचा नसावा.
विद्यार्थी केवळ प्रथम वर्षात प्रवेशित असावा.

इतर बातम्याः

Nashik Planning: नाशिकच्या योजनांसाठी 807.86 कोटींची आर्थिक मर्यादा; काय आहे यंदाचे नियोजन?

Nashik|कोरोनाचे बळी 4 हजार अन् अनुदानासाठी अर्ज आले 8 हजार; मग मृतांची आकडेवारी खोटी की, अर्जदार बोगस?

Agricultural scam|16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणणे सुरू; पोलिसांच्या तिघांना बेड्या