Raj Thackrey : साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका – राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका

नाशिकमधील आगामी कुंभमेळ्यासाठी साधूग्राम उभारण्याच्या नावाखाली हजारो झाडे तोडण्याच्या सरकारच्या योजनेला तीव्र विरोध होत आहे. पर्यावरणप्रेमी, अभिनेते सयाजी शिंदे यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आवाज उठवला आहे. सरकारने साधूंच्या आड उद्योगपतींसाठी जमीन हडपण्याचा प्रयत्न करू नये, असे ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी नाशिककरांना एकत्र येण्याचे आवाहन करत मनसे पाठिंबा देईल असे स्पष्ट केले.

Raj Thackrey : साधूंच्या नावाखाली संधिसाधूपणा करू नका - राज ठाकरेंची सरकारवर कडाडून टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Image Credit source: social media
| Updated on: Nov 29, 2025 | 11:31 AM

नाशिकमधील आगामी कुंभमेळ्याच्या परार्श्वभूमीवर साधूंसाठी साधूग्राम उभारण्याची सरकारची योजना असून त्यासाठी नाशिकच्या तपोवनामधली सुमारे 1800 झाड तोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. मा्तर नाशिकमधील पराय्वरण, वृक्षप्रेमींनी याला कडाडून विरोध केला असून एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्यावरून वातावरण तापलेलं आहे. आज सकाळी अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकला भेट देऊन वृक्षप्रेमींची बाजूऐकून घेतली आणि त्यांना पाठिबां दर्शवला. सयाजी शिंदे यांनी सर्व नाशिककरांना सरकार विरोधात एकत्र येण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यानंतर आता आणखी एक राजकीय नेत्याने यासंदर्भात आवज उठवत वृक्षतोडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.

सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये, अशा शब्दांत राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी सरकारला फटकारलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबकूवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरून एक भलीमोठी पोस्ट लिहीत राज ठाकरेनीं सरकारवर निशाणा साधला असून तपोवनताली वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. ‘ आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ‘ असे टीकास्त्र त्यांनी सोडलं.

राज ठाकरे यांची पोस्ट जशीच्या तशी…

आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला. एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ?

मग तिकडेच झाडं लावा ना..

बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो.
आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत !

नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा.

तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच ! असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.