नाशिकमध्ये 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एकट्या सिन्नरमध्ये 198 जण

नाशिक जिल्ह्यात सध्या 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १० ने घट झाली आहे.

नाशिकमध्ये 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू; एकट्या सिन्नरमध्ये 198 जण
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 01, 2021 | 6:26 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यात सध्या 940 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 98 हजार 890 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १० ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 57, बागलाण 12, चांदवड 23, देवळा 23, दिंडोरी 34, इगतपुरी 9, कळवण 10, मालेगाव 17, नांदगाव 9, निफाड 135, पेठ 1, सिन्नर 198, त्र्यंबकेश्वर 5, येवला 93 अशा एकूण 626 जणांचा समावेश आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात 279, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 22, तर जिल्ह्याबाहेरील 13 रुग्ण असून, एकूण 940 रुग्णांवर उपचार सुरू आहे. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 8 हजार 463 रुग्ण आढळून आले आहेत.

नवरात्रोत्सवात कोरोना नियम कडक

कोरोना काळातही वणीच्या सप्तशृंगीगडावर नवरात्रोत्सवाची मोठ्या उत्साहात तयारी सुरू आहे. नवरात्र काळात हे मंदिर 24 तास खुले राहणार आहे. मात्र, भाविकांना पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. 65 वर्षावरील व्यक्ती, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि लहान मुलांना या काळात गडावर येऊ नये, असे आवाहन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पास मिळवण्यासाठी कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतल्याचा प्रमाणपत्र किंवा 72 तासांपूर्वी केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट बंधनकारक आहे.

म्हणून खरबदारी घेणे सुरू

नाशिकमध्ये अजूनही कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होताना दिसत नाही. सिन्नर आणि निफाड तालुक्यामध्ये रुग्णांची वाढ सातत्याने सुरू आहे. एकीकडे सरकारने शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना शून्यावर जायला तयार नाही. कोरोना नियमांचे पालन सध्या कुठेही होताना दिसत नाही. मोठेमोठे खासगी कार्यक्रम जिल्ह्यात होताना दिसतायत. एखाद्या कार्यक्रमाला जेवणावळीसाठी फक्त शंभर जणांच्या उपस्थितीची परवानगी असेल, तर नागरिक दुपारी बारापर्यंत शंभर आणि सायंकाळी शंभर जणांना बोलवातयत. प्रत्येक नियमाला काही ना काही पळवाट आहे. अनेक जण मास्क घालत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या काही केल्या कमी व्हायला तयार नाही. हे पाहता नवरात्रोत्सवात कडक खबरदारी घेणे सुरू आहे.

(940 corona patients undergoing treatment in Nashik; 198 in Sinnar alone)