शहीद जवानांच्या कुटुंबांना जमीन वाटप; नाशिकमध्ये विशेष मोहीम सुरू

नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेण्यात आली आहे.

शहीद जवानांच्या कुटुंबांना जमीन वाटप; नाशिकमध्ये विशेष मोहीम सुरू
नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबास जमीन वाटप केली.
| Edited By: मनोज कुलकर्णी | Updated on: Oct 12, 2021 | 11:31 AM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातून शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिन्नर येथील वीर माता यांना जमीन मंजुरीचा आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सुपूर्द केला. ही जमीन वाटप करताना आपण शहीद जवानास योग्यन श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान मिळत आहे, असे प्रतिपादन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी आयोजित विशेष मोहिमेच्या कार्यक्रमावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, तहसीलदार राजेंद्र नजन, स्वीय सहायक संतोष तांदळे, दिनेश वाघ, आदित्य परदेशी, वीरमाता किसनाबाई बोडके, वीरपिता श्रीकृष्ण बोडके, प्रीती बोडके, सुरेश कातकाडे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, देशाच्या सीमेवर कार्यरत असताना देशासाठी बलिदान केलेल्यांप्रती शासनाची भूमिका अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यातील आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काम सुरू असून त्यासाठी विशेष मोहीम आपण हाती घेतली आहे. २४ सप्टेंबर २००२ मध्ये जम्मू काश्मीर मधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना शहीद श्रीकांत श्रीकृष्ण बोडके यांना वीरगती प्राप्त झाली होती. आज त्यांना जमीन मंजूर आदेश सुपूर्द करताना जवानास योग्यरित्या श्रद्धांजली अर्पण केल्याचे समाधान आहे. वीरमाता किसनाबाई बोडके म्हणाल्या, शहीद झालेल्या माझ्या मुलाची नेहमीच आठवण येते. मुलाने जिवंतपणी आई वडिलांसाठी काही करणे हा तर नियमच आहे; मात्र माझा श्रीकांत स्वतः देशासाठी शहीद होऊन आमच्यासाठी एवढ करून ठेवलंय याचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचे यावेळी आभार मानले.

देशाच्या सीमेवर कार्यरत असताना देशासाठी बलिदान केलेल्यांप्रती शासनाची भूमिका अतिशय संवेदनशील आहे. जिल्ह्यातील आणखी काही प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर काम सुरू असून त्यासाठी विशेष मोहीम आपण हाती घेतली आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

मुलाने जिवंतपणी आई वडिलांसाठी काही करणे हा तर नियमच आहे; मात्र माझा श्रीकांत स्वतः देशासाठी शहीद होऊन आमच्यासाठी एवढ करून ठेवलंय याचा अभिमान वाटतो

– किसनबाई बोडके, वीरमाता

इतर बातम्याः

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित

लग्नकार्य नाही तर अवैध दारु बनवण्यासाठी लॉन दिले, नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us