AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये घडला असून, याप्रकरणी महापालिका शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिले, मालेगावमधला धक्कादायक प्रकार; राष्ट्रीय कर्तव्यात कसूर करणारे 10 शिक्षक निलंबित
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 12, 2021 | 11:05 AM
Share

नाशिकः कोरोना लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावमध्ये घडला असून, याप्रकरणी महापालिका शाळेतील 10 शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. मालेगाव दोन्ही लाटेमध्ये हॉटस्पॉट ठरले. हे पाहता राज्य सरकारने लसीकरण वेगात राबवले. नाशिक जिल्ह्यातही लसीकरणाने मोठे उद्दीष्ट साध्य केले. मात्र, हे लसीकरण नेमके कशा पद्धतीने झाले याच्या एकेक सुरूस कथा आता बाहेर येत आहेत. लसीकरणासाठी अनेक ठिकाणी शाळेत केंद्र थाटण्यात आले होते. शिक्षकांना या कामी नियुक्त करण्यात आले होते. मालेगावमधल्या संगमेश्वर वॉर्डात जुलै महिन्यात लसीकरण मोहीम राबवली. यात 2 जुलै 2021 रोजी कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांनी 13 जणांना कोविड लस न देताच प्रमाणपत्र दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून याप्रकरणी दहा शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, एकीकडे अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.  त्यात संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक 24, श्रीगोंदा तालुक्यातील 9, राहाता तालुक्यातील 7 तर पारनेर तालुक्यातील 6 गावांसह अकोले, कर्जत, कोपरगाव, नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर या तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यत कडक लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे नाशिककरांमागे चिंतेचा भुंगा लागला आहे. कारण नाशिकमधल्या सिन्नर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत 200 च्या जवळपास रुग्ण वाढत आहेत. सिन्नर तालुक्यातील नागरिकांचा नगरशी सातत्याने संबंध येतो. त्यामुळे येथील रुग्ण वाढत असल्याची शंका आहे. त्यात लसीकरणातला पहिला घोळ उघडकीस आल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच कोरोना रुग्ण वाढल्यास कडक निर्बंध लावण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यालय न सोडण्याची तंबी

निलंबित शिक्षकांना मुख्यालय सोडू नये, अशी तंबी देण्यात आली आहे. त्यांना रोज सकाळी दहा वाजता शिक्षणट मंडळ कार्यालयात हजेरी लावून स्वाक्षरी करावी लागेल. निलंबन काळात शिक्षकांना नियमाप्रमाणे निर्वाह भत्ता मिळणार आहे.

आयुक्तांना निवेदन

दरम्यान, याप्रकरणी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. उर्दू शिक्षक संघाने महापालिका आयुक्त भालचंद्र गोसावी यांना निवेदन देत शिक्षकांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी उपायुक्त आणि प्रशासनाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे.

इतर बातम्याः

गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज

Wife’s murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप

धक्कादायकः खेळता-खेळताच ग्राऊंडवर कोसळला, चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या किक्रेटपटूचा नाशिकमध्ये मृत्यू

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.