AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wife’s murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप

टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात स्वयंपाकघरातील लोखंडी मुसळ घालून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सोमवारी (10 ऑक्टोबर) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Wife's murder: टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात मुसळ घालून खून; नाशिकमधल्या घटनेत आरोपीला जन्मठेप
संग्रहित छायाचित्र
| Updated on: Oct 11, 2021 | 9:13 PM
Share

मनोज कुलकर्णी, नाशिकः टीव्ही बघणाऱ्या बायकोच्या डोक्यात स्वयंपाकघरातील लोखंडी मुसळ घालून खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आज सोमवारी (10 ऑक्टोबर) जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आण्णासाहेब निवृत्ती गायके (वय 55) असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, आण्णासाहेब गायके हा पत्नी ज्योती गायके (वय 50) यांच्यासोबत नाशिकरोडवरील शिवराम नगरमध्ये रहायचा. त्यांना अजिंक्य गायके (वय 32) हा मुलगा आहे. आरोपी आण्णासाहेब हा पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायचा. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी कडाक्याचे भांडण व्हायचे. 10 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी साडेसात वाजता ज्योती या घरातील हॉलमध्ये टीव्ही बघत बसल्या होत्या. यावेळी पुन्हा एकदा आण्णासाहेब याने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. शब्दाला शब्द वाढत जाऊन वाद विकोपाला गेला. त्यात आण्णासाहेब याने स्वयंपाक घरातील लोखंडी मुसळ आणून पत्नी ज्योतीच्या डोक्यात घातले. हे भांडण सोडवण्यासाठी मुलगा अजिंक्य आणि आण्णासाहेबची बहीण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने या दोघांनाही ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात कलम 302, 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अन्यथा सहा वर्षांचा कारावासही…

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी केला. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून जिल्हा व सत्र न्यायालय नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले. यावर आज सोमवारी (11 ऑक्टोबर) न्यायमूर्ती व्ही. एस. कुलकर्णी यांनी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपीस कलम 302 नुसार जन्मठेप आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

पोलीस आयुक्तांकडून कौतुक

खटल्यात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून सुलभा सांगळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार के. के. गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल आर. आर. जाधव, पोलीस हवालदार आर. एन. देशमुख यांनी काम पाहिले. याप्रकरणी तपासी अंमलदार आणि पैरवी अधिकाऱ्यांनी गुन्हा सिद्ध होण्यासाठी केलेल्या कामगिरीचे पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

इतर बातम्याः

गुन्हेगारांची सुरस कथाः पठ्ठे ऐटबाज रहायचे, चारचाकीतून यायचे अन् मंगळसूत्र चोरायचे; गुजरातची टोळी नाशिकमध्ये चतुर्भुज

धक्कादायकः खेळता-खेळताच ग्राऊंडवर कोसळला, चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या किक्रेटपटूचा नाशिकमध्ये मृत्यू

मंत्री भुजबळांच्या येवला मतदार संघात महाराष्ट्र बंदकडे व्यापाऱ्यांची पाठ; बाजार पेठेतील दुकाने सताड उघडी

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...