धक्कादायकः खेळता-खेळताच ग्राऊंडवर कोसळला, चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या किक्रेटपटूचा नाशिकमध्ये मृत्यू

क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या सिडको भागात घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

धक्कादायकः खेळता-खेळताच ग्राऊंडवर कोसळला, चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या किक्रेटपटूचा नाशिकमध्ये मृत्यू
श्रेयस ढोरे, क्रिकेटपटू, नाशिक.


नाशिकः क्रिकेट खेळताना चक्कर येऊन अवघ्या 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या सिडको भागात घडली आहे. श्रेयस सुधीर ढोरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

नाशिकमधल्या सिडकोतल्या रणभूमी मैदानावर श्रेयस आणि त्याच्या मित्रांचा रोज क्रिकेटचा डाव रंगायचा. रविवारीही त्यांचा क्रिकेटचा डाव रंगला. मात्र, श्रेयसला अस्वस्थता जाणवू लागली. त्याकडे त्याने दुर्लक्ष केले. काही वेळानंतर त्याला अचानक चक्कर आली. तो खाली बसला. मुलांना वाटले दमला असेल. त्यामुळे त्यांनी त्याच्याभोवती कोंडाळे केले. काही वेळातच त्याची तब्येत खालावली. तो बेशुद्ध पडला. मुलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. कोणी त्याच्या तोंडात फुंकले, तर कोणी वारा घालण्याचा प्रयत्न केला. पण श्रेयसने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या श्रेयसच्या मित्रांनी त्याला उचलून वाहनापर्यंत नेले आणि थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. श्रेयसची तब्येत बिघडल्याची माहिती त्याच्या घरी देण्यात आली. श्रेयसचे वडील, आई आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय गाठले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासले आणि त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. अवघ्या पंधरा वर्षांच्या तरुण क्रिकेटपटूचा असा करुण अंत व्हावा, याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. श्रेयसच्या अचानक झालेल्या मृत्यूचा त्याच्या मित्रमंडळींना चांगलाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

मानसिक ताणाचा परिणाम?

श्रेयसचा मृत्यू मानसिक ताणामुळे झालेला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, हा ताण नेमका कशाचा, याबद्दल तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. श्रेयस रोज खेळायला यायचा. त्याला अभ्यासाचा ताण होता की, आणखी कशाचा? की ह्रदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, इतक्या कमी वयात क्रिकेटपटूला काळाने असे हिरावून नेल्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. श्रेयस उत्तम क्रिकेट खेळायचा. तो ऑलराऊंडर होता. त्याच्या मृत्यूने मित्रमंडळीला जबर धक्का बसला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातही एका स्पर्धेत अशीच घटना घडली होती. पुण्यातल्या जाधववाडी येथे मयूर चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महेश नलावडे या क्रिकेटपटूचा फलंदाजी करतानाच ह्रदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

इतर बातम्याः

मंत्री भुजबळ म्हणतायत, काही व्यापारी भाजपला मानणारे; त्यामुळे त्यांचा बंदला विरोध

Gold price: सोने स्वस्तच, पण महाराष्ट्र बंदमुळे नाशिकमध्ये अनेक सराफा दुकान बंद!

नाशिकमध्ये अजूनही म्युकरमायकोसिसचे 23 रुग्ण; कोरोनाच्या 783 रुग्णांवर उपचार सुरू

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI