Vastu Shastra : कोणत्या वास्तुदोषामुळे घरात पितृदोष निर्माण होतो? जाणून घ्या उपाय
जेव्हा आपले पूर्वज नाराज असतात किंवा, त्यांची एखादी इच्छा मृत्यूनंतर मागे राहिलेली असते, तेव्हा घरात पितृदोष निर्माण होतो.घरात पितृदोष निर्माण झाल्यास तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात, आज आपण पितृदोषाबद्दल जाणून घेणार आहोत.

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? तुमचं देवघर कुठे असावं? बेडरूम कोणत्या दिशेला असावी? अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आपल्या हातातून न कळत घडतात ज्यामुळे घरात पितृदोष निर्माण होण्याची शक्यता असते, तुमच्या घरात जर पितृदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.जर एखाद्या कुटुंबात पितृदोष असेल तर अशा कुटुंबात नेहमी काहीही कारण नसताना वाद विवाद होतात, आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच संतती प्राप्तीसाठी देखील अडचणी येतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पितृदोष दूर करण्यासाठी दर वर्ष आपल्या पूर्वजांचे श्राद्ध आणि पक्ष ज्याला आपन पित्र असं देखील म्हणतो, ते करणं गरजेचं असतं. पक्ष हे दर वर्षी येणाऱ्या पितृ पंधरवाड्यात केले जातात, चला तर मग जाणून घेऊयात घरात पितृदोष का निर्माण होतो? आणि त्याचे उपाय काय आहेत?
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक फोटो कोणत्या दिशेला असावा? याची एक निश्चित दिशा ठरलेली असते. आपल्या घरतील पूर्वजांचे फोटो हे नेहमी दक्षिण दिशेलाच असावेत, जर तुम्ही तुमच्या घरातील पूर्वजांचे फोटो इतर कोणत्या दिशेला लावले असतील, तर त्यामुळे घरात पितृदोष निर्माण होतो. तसेच तुमच्या देवघरात कधीही तुमच्या पूर्वजांचे फोटो नसावेत, असं वास्तुशास्त्र सांगतं. जर तुम्ही काहीही कारण नसताना पिंपळांचं झाडं तोडलं, तरी देखील पितृदोष निर्माण होतो. पितरांच्या नावानं तर्पण करावं, जर तुम्ही तर्पण केलं नाही तरी देखील घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो.
उपाय – वास्तुशास्त्रामध्ये घरातील पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या पूर्वजांचा फोटो इतर कोणत्याही दिशेला न ठेवता तो केवळ दक्षिण दिशेलाच लावावा. पूर्वजांच्या नावाने तर्पण करावं, तसेच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या प्रदक्षिणा माराव्यात. नवचंडीची पूजा केली तरी देखील घरातून पितृदोष दूर होण्यास मदत होते. पितृदोषामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे घरात पितृदोष तयार झाला तर आपण या सोप्या उपायांनी तो दूर करू शकतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
