बस नाम ही काफी है ! या इंडियन सिंगल माल्ट्स व्हिस्कीचा जगात दबदबा
भारतात अल्कोहोल मार्केट साल 2026 मध्ये तेजीत असणार आहे. एका अंदाजानुसार महसुल सुमारे 5.3 लाख कोटी रुपयांपर्यंत (सुमारे 62 बिलियन डॉलर) पोहचू शकतो.

काही वर्षांपूर्वी जेव्हा प्रीमियम व्हिस्कीची चर्चा व्हायची तेव्हा परदेशातील ब्रँड नजरे समोर यायचे. परंतू आता जग बदलले आहे. भारताची सिंगल माल्ट व्हिस्कीने जगात नाम कमावले आहे. जगातील असे कोणतेही दुकान नाही जेथे भारताच्या सिंगल माल्टला मागणी नाही. जगभरातील अनेक ब्रँड भारताच्या सिंगल माल्ट व्हिस्की समोर गुडघे टेकतात. जगातला असा कोणताही लिकर अवॉर्ड नाही जो या भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीने नावावर केला नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गुणवत्ता आणि क्लास. चला तर अशा कोणत्या सिंगल माल्ट्स आहेत ज्यांनी ग्लोबल लेव्हलला भारताचे नाव गाजवले आहे.
परदेशात या सिंगल माल्टची धूम
देवांस ज्ञानचंद आडम्बरा आणि मंषा: आडम्बराने लास वेगास येथे आयोजित इंटरनॅशनल व्हिस्की कॉम्पिटीशन (IWC) मध्ये बेस्ट इंडियन सिंगल माल्ट आणि बेस्ट इंडियन व्हिस्कीचा पुरस्कार पटकवला आहे. तर मंषाला जर्मनीच्या इंटरनॅशनल स्पिरिट्स अवॉर्ड्स (ISW) मध्ये इंटरनॅशनल व्हिस्की ऑफ द इअर या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
इंद्री-त्रिणि द्रु: आपल्या दमदार कास्क- स्ट्रेंथ प्रोफाईलसाठी ओळखली जाणारी व्हिस्की इंद्रीने मायामी ग्लोबल स्पिरीट अवॉर्ड्स 2025 मध्ये बेस्ट वर्ल्ड व्हिस्की आणि इंटरनॅशनल स्पिरिट्स चॅलेंजमध्ये गोल्ड अवार्ड पटकावला आहे.
पॉल जॉन: दि ग्रेट इंडियन सिंगल मल्टच्या रुपात ओळख तयार करणारी पॉल जॉनला बेस्ट इंडियन सिंगल माल्ट, बेस्ट एशियन व्हिस्की सहीत सॅन फ्रान्सिस्को वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटीशनमध्ये डबल गोल्ड सारखा प्रतिष्ठीत सन्मान मिळाला आहे.
गोडावन: भारताची सर्वात सन्मानिक सिंगल माल्ट्समध्ये समाविष्ट असलेली गोडावनला आतापर्यंत 85 हून अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. यात लंडन स्पिरिट्स कॉम्पिटीशन 2024 चा सिंगल माल्ट व्हिस्की ऑफ द इयर हा सन्मान देखील सामील आहे.
भारतीय अल्कोहोल मार्केटची खास बाबी
रेव्हेन्यू: आर्थिक वर्ष 2026 मध्ये 8 ते 10 वाढी सह 5,30,000 कोटी रुपयांपर्यंत ( सुमारे अब्ज डॉलर ) पोहचण्याचा अंदाज आहे.
का येणार उसळी ?– शहरीकरण, डिस्पोजेबल इन्कममध्ये वाढ, वाढता मध्यम आणि उच्च मध्यम वर्ग आणि प्रीमीयम उत्पादनांकडे कल
प्रीमियम प्रोडक्ट्सची मागणी – 1,000 रुपयांहून महाग असलेल्या लक्झरी स्पिरीट्सच्या विक्रीत 15 टक्के वाढीचा अंदाज आहे.त्यामुळे एकूण महसुलात वाढ होणार आहे.
वॉल्यूममध्ये वाढ : 5-6% चा अंदाज आहे. परंतू उच्च करामुळे स्पिरिट्सच्या व्हॉल्युमची ग्रोथमध्ये किरकोळ कमतरता येऊ शकते.
स्पिरिट्सचे प्राबल्य : स्पिरिट्सचा बाजारात 65-70 टक्के हिस्सा आणि उर्वरित हिस्सा बिअर, वाईन आणि देशी दारुचा आहे.
भारतातीलअल्कोहोल मार्केट –
भारताचे अल्कोहोल मार्केटमध्ये साल 2026 मोठे गाजणार आहे. अंदाजानुसार महसुल देखील सुमारे 5.3 लाख कोटी रुपयांपर्यंत ( सुमारे 62 अब्ज डॉलर ) पर्यंत पोहचू शकतो. मजबूत 8-10 टक्के महसुल वाढ (आर्थिक वर्ष 2026), प्रीमीयम उत्पादनांची वाढती मागणी, वाढता डिस्पोजेबल इन्कम आणि दारु पिणाऱ्यांची वाढती संख्या यामुळे बाजारात उसळी येणार आहे. मात्र राज्यातील नियमातील विसंगतपणा, इनपुट कॉस्टमधील चढ-उतार सारख्या आव्हानांनी बाजार प्रभावित होऊ शकतो. स्पिरिट्सचा दबदबा कायम असून प्रीमीयम आणि लक्झरी बँडच्या प्रोडक्टना वाढती मागणी यामुळे मार्केट वधारणार आहे.
