लग्नकार्य नाही तर अवैध दारु बनवण्यासाठी लॉन दिले, नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त

साखरपुडा असो किंवा लग्नकार्य डोळ्यासमोर येते ते मंगल कार्यालय, लॉन्स. मात्र या शुभकार्याच्या याठिकाणी देशी बनावट दारुचा अवैध कारखाना सुरू असेल तर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. पण नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावात अशी एक घटना घडली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या सचिन पाटील यांच्या पथकाने या देशी बनावट दारुचा अवैध कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे.

लग्नकार्य नाही तर अवैध दारु बनवण्यासाठी लॉन दिले, नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटीचा मुद्देमाल जप्त
Nashik Illegal Liquor Factory
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 8:04 AM

नाशिक : साखरपुडा असो किंवा लग्नकार्य डोळ्यासमोर येते ते मंगल कार्यालय, लॉन्स. मात्र या शुभकार्याच्या याठिकाणी देशी बनावट दारुचा अवैध कारखाना सुरू असेल तर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. पण नाशिकच्या निफाड तालुक्यातील चांदोरी गावात अशी एक घटना घडली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या सचिन पाटील यांच्या पथकाने या देशी बनावट दारुचा अवैध कारखान्यावर धाड टाकत कारवाई केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्यावर्षी मार्च महिन्यात सुरु झाला त्याचा थेट परिणाम लग्न समारंभ यावर पाहायला मिळाला. गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून साखरपुडा, लग्नकार्यावर बंदी आल्याने मंगल कार्यलय, लॉन्सचे मेंटेनन्स काढणे मुश्कील झाल्याने येवला तालुक्‍यात कांदा साठवण्यासाठी मंगल कार्यालय भाड्याने दिल्याचे आपण मध्यंतरी बघितले. मात्र निफाड तालुक्यातील चांदोरी येथे चक्क दारु बनवण्यासाठी लॉन्स दिल्याचे समोर आले आहे.

नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील सायखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील निफाड तालुक्यातील चांदोरी येथील अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीचे उदयनराजे लॉन्स आहे. यावर अवैध देशी दारू तयार होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने 11 ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. यावेळी संजय मल्हारी दाते वय वर्ष 47 राहणार गोंदेगाव तालुका निफाड हा तिथे सापडला.

येथून बनावट देशी दारुचे अंदाजे 1500 ते 2000 बॉक्स, अंदाजे दहा हजार ते पंधरा हजार देशी दारुच्या रिकाम्या बाटल्या, 20 हजार लिटर स्पिरिट, दोनशे लीटर चे 90 ते 100 बॅरेल, रिकामे बॉक्स अंदाजे पाच हजार ते 10 हजार, देशी दारु बनवण्याचे साहित्य 5 पाण्याच्या टाक्या, एक मालट्रक असा एकूण एक कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

पोलिसांच्या या कारवाईने अवैद्य धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची दादागिरी, शीतपेय खरेदी केलं, नंतर पैसे मागणाऱ्या दुकानदाराला फरफटत नेल्याचा आरोप

पत्नीचे परपुरुषासोबत संबंध, त्याने तिच्या प्रियकराचं शीर कापलं, देहाचे तुकडे करत जाळलं, पोलिसाकडूनच निर्घृण कृत्य

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.