VIDEO : शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची दादागिरी, शीतपेय खरेदी केलं, नंतर पैसे मागणाऱ्या दुकानदाराला फरफटत नेल्याचा आरोप

जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला.

VIDEO : शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची दादागिरी, शीतपेय खरेदी केलं, नंतर पैसे मागणाऱ्या दुकानदाराला फरफटत नेल्याचा आरोप
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची दादागिरी, शीतपेय खरेदी केलं, नंतर पैसे मागणाऱ्या दुकानदाराला फरफटत नेल्याचा आरोप


जळगाव : जळगावात महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा एक संतापजनक प्रकार समोर आलाय. जळगाव शहरातील नवीपेठेत गोलाणी मार्केटजवळ हा संतापजनक प्रकार घडला. शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने किर्तीकुमार चोरडिया नामक व्यक्तीच्या आईस्क्रीम पार्लरमधून शीतपेय व खाद्यपदार्थ घेतले. पण पैसे न देताच तेथून काढता पाय घेतला. यावेळी दुकानदाराने पैशांची मागणी केली असता त्याला फरफटत नेण्यात आलं. या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत.

दुकानदाराला कारसोबत फरफटत नेले

शीतपेय व खाद्यपदार्थ घेतलेली महिला कारमधून निघून जात असल्याचे पाहून चोरडिया यांनी पैसे मागण्यासाठी त्यांच्या मागे धाव घेतली. आपण पैसे देणार नाही, असे उत्तर महिलेकडून चोरडिया यांना मिळाले. त्यामुळे ते संतप्त झाले. मात्र यावेळी कारचालकाने कार पळवून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरडिया कारसोबत फरपटत गेले. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने ते कारच्या चाकाखाली येण्यापासून वाचले.

संबंधित महिलेचा पैसे दिल्याचा दावा

आजूबाजूला असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने कारचालकाने कार थांबवली. त्याठिकाणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी अरेरावी केल्याचा आरोप चोरडिया यांनी केला. त्या संबंधित महिलेने आपण पैसे दिल्याचा दावा केला. मात्र, चोरडिया यांनी आपल्याला पैसे दिले नसल्याचे सांगितले. आपण दुकान सुरू ठेवल्याने आपल्यासोबत हा प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी प्रकरणावर पडदा टाकला

दरम्यान, हा प्रकार अंगाशी येत असल्याचे पाहून शिवसेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते त्याठिकाणी जमले. त्यांनी चोरडिया यांची समजूत घालून वादावर पडदा टाकला. नंतर चोरडिया यांना बिलाचे पैसेही मिळाले. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, जनमानसातून संताप व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

भुसावळमध्ये महाराष्ट्र बंदला गालबोट

दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातील भुसावळच्या वरणगावात महाराष्ट्र बंदला गालबोट लागल्याची घटना समोर आली आहे. वरणगावात आज राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी गटाने परिसरात फिरत होते. ते दुकानदारांना दुकानं बंद करण्याचं सांगत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत होते. विशेष म्हणजे या गटाने वरणगाव पोलीस ठाण्यात त्याबाबत कळवले होते. तसेच व्यापाऱ्यांनादेखील बंद पाळण्याचं आवाहन केलं होतं. तरीही काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केलं नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. ते व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करत होते.

दरम्यान, याचवेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष यांचा गट सुद्धा याच रस्त्याने फिरुन दुकाने उघडण्याचं आवाहन करत होता. यावेळी व्यापारी नेमकं कुणाचं ऐकावं या विचाराने संभ्रमात पडले. याचवेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा गट आणि भाजपचा गट आमनेसामने आले. दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरु होत्या. एक गट बंदची हाक देत होता. तर दुसरा गट बंदला विरोध करण्याची घोषणा करत होता. त्यामुळे दोन्ही गटात तुफान शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. या गदारोळात भाजपचे सुनील काळे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा :

जळगावात महाराष्ट्र बंदला गालबोट, महाविकास आघाडी आणि भाजपचा गट आमनेसामने, प्रचंड गदारोळ

VIDEO : धक्कादायक ! मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI