AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : धक्कादायक ! मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात याबाबत तक्रार केली आहे.

VIDEO : धक्कादायक ! मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?
मुंबई पोलिसातील बडा अधिकारी एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत ठेवतोय?
| Edited By: Chetan Patil | Updated on: Oct 11, 2021 | 11:26 PM
Share

मुंबई : मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपल्यामागे पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसात याबाबत तक्रार केली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली आहे. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्यावर कोण आणि कशासाठी पाळत ठेवत आहे? असा प्रश्न निर्माण होतोय.

नवाब मलिकांच्या आरोपांनंतर आता समीर वानखेडेंवर पाळत?

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित होतोय. याप्रकरणी स्वत: समीर वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पाळत ठेवणाऱ्यांपैकी एक व्यक्ती मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचा दावा

समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आलं होतं त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते 2015 पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी (11 ऑक्टोबर) जाणवलं. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले आहे. त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला आहे. पाठलाग करणाऱ्या दोघांपैकी एक व्यक्ती ही मुंबई पोलीस दलात महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेली व्यक्ती आहे, असं वानखेडे यांचं म्हणणं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवाब मलिक यांचे नेमके आरोप काय?

युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते,  त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते.

प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. १३०० लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री १२ तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी ११ लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं.

दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले. १३०० लोकांपैकी ११ लोकांना पकडण्यात आलं तर तिघांना का सोडलं हे सांगा. समीर वानखेडेंनी याचा खुलासा तात्काळ सोडावं. १३०० पैकी ११ लोकांनाच का पकडलं, ३ जणांना का सोडलं, कोणत्या माहितीवरुन का सोडलं हे सांगावं.

व्हॉट्सअॅप चॅटवरुन पुढे तपास सुरु आहे. तीन लोकांना का आणि कसं सोडलं. छापेमारीचं काम हे पूर्णपणे बनावट आहे. प्लॅन करुन छापा टाकला, प्लॅन करुन बातम्या पुरवल्या, प्लॅन करुनच लोकांना फसवण्यात आलं. ते निर्दोष आहेत की गुन्हेगार आहेत हे न्यायालयात ठरवलं जाईल. पण तिघांना का सोडलं हा आमचा सवाल आहे.

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल.

हेही वाचा : NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

Follow Us
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु;
मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या याचिकेवर सुनावणी सुरु; कोर्टात...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू...
निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची मोठी मागणी
Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून महाजनांना...
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी.

ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये  नेमकं काय घडलं?.

IND vs ENG: वादाच्या चर्चा रंगल्या असातना गौतम गंभीर आणि विराट कोहली एकत्र, लंडनमध्ये नेमकं काय घडलं?

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला...

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..

एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट… ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ.

एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट… ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ