AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायणम्' या भव्यदिव्य चित्रपटात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच तो त्याच्या भूमिकेबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. यावेळी सनी देओल नेमकं काय म्हणाला, ते जाणून घ्या..

हे अजिबात सोपं नाही..; 'रामायणम्'मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..
Sunny Deol and Ranbir KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 19, 2026 | 3:53 PM
Share

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील मुख्य कलाकार उपस्थित होते. तब्बल 4000 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात सनी देओल त्याच्या भूमिकेविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. सनी देओलने नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. ‘रामायणम्’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून पहिल्या भागात सनी देओलची खूप छोटी भूमिका आहे.

या भूमिकेविषयी चाहत्यांशी बोलताना सनी म्हणाला, “खरं सांगायचं तर, मी आताच यावर काम सुरू केलं आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. पण रामायण आपल्या हिंदुस्तानी लोकांसाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. मला हनुमानजींची भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी वाहेगुरूजींचे आभार मानतो. ही भूमिका साकारणं अजिबात सोपं नाही. पण हा प्रवास खूप मजेशीर आहे. हनुमानजी अत्यंत सामर्थ्यवान, सर्वांचे प्रिय आणि प्रभू राम यांचे एकनिष्ठ भक्त आहेत. नमित यांनी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असा एक भव्य चित्रपट साकारला आहे.”

पहा व्हिडीओ

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायणम्’ या भव्य चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. हनुमान जयंतीचं निमित्त साधत या चित्रपटातील प्रभू राम यांची झलक सादर करण्यात आली होती. आठ वेळा ऑस्कर पुरस्कार विजेता व्हिज्युअल इफेक्ट्स स्टुडिओ डीएनईजी आणि यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांच्या सहकार्याने हा भव्यदिव्य चित्रपट साकारण्यात आला आहे. हजारो वर्षांपासून जपली गेलेली रामायणाची कथा नव्या रुपात प्रेक्षकांसमोर या चित्रपटातून मांडण्यात येत आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी फळीच पहायला मिळणार आहे. केजीएफ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रामायण हा भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाकांक्षी चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या दोन्ही चित्रपटांचं एकूण बजेट अंदाजे 4000 कोटी रुपये आहे. त्यामुळे आतापर्यंतचा हा सर्वांत महागडा भारतीय चित्रपट ठरला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, यश, साई पल्लवी, सनी देओल, रवी दुबे यांच्या भूमिका आहेत.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक