AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना या सामन्यातील पहिली 55 मिनिटं मेस्सीसाठी खूप महत्त्वाची आहे. असं का ते जाणून घेऊयात

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण...
FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण...Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 19, 2026 | 3:21 PM
Share

Argentina vs Spain Final: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा मानकरी आता काही तासातच कळणार आहे. अर्जेंटीना आणि स्पेन यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहीलं तर दोन्ही संघाचं पारडं जड आहे. पण गतविजेता अर्जेंटीना संघ स्पेनच्या तुलनेत उजवा आहे. या सामन्यातील पहिली 55 मिनिटं अर्जेंटीनाचा कर्णधार लियोनल मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहे. याचा थेट संबंध गोल्डन बूटच्या शर्यतीशी जोडला जात आहे. कारण तिसऱ्या क्रमांकाच्या संघासाठी झालेल्या फ्रान्स-इंग्लंड सामन्यात एम्बाप्पेने कमाल केली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एम्बाप्पेने एक असिस्ट आणि 2 गोल मारत मेस्सीच्या पुढे निघून गेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं मेस्सीसाठी महत्त्वाची असणार आहेत.

55 मिनिटात 2 गोल मारवे लागणार

फ्रान्सच्या एम्बाप्पेला गोल्डन बूटच्या शर्यतीत मागे टाकण्यासाठी मेस्सीपुढे आता तीन मार्ग आहेत. यात पहिला मार्ग म्हणजे अंतिम सामन्यातील पहिल्या 55 मिनिटांच्या खेळाशी निगडीत आहे. मेस्सीने जर पहिल्या 55 मिनिटात किंवा त्यापेक्षा कमी वेळात दोन गोल मारले तर गोल्डन बुटच्या शर्यतीत एम्बाप्पेच्या पुढे निघून जाईल.

अंतिम सामन्यात हॅट्ट्रीक मारून गोल्डन बूट मिळणार

एम्बाप्पेने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात 10 गोल मारले आहेत. तर 4 गोल असिस्ट केले आहेत. दुसरीकडे, मेस्सीच्या नावावर 8 गोल असून 4 असिस्ट केले आहे. त्यामुळे एम्बाप्पेला मागे टाकण्यासाठी मेस्सीला अंतिम सामन्यात तीन गोल मारावे लागतील. जर त्याने तसं केलं तर 11 गोल होतील आणि त्याला गोल्डन बूट मिळेल.

दोन गोल आणि 1 असिस्ट केला तरी मेस्सी सरस

तिसरा मार्ग म्हणजे अंतिम सामन्यात मेस्सीला दोन गोल मारून एक गोल असिस्ट करावा लागेल. दोन गोल मारले तर एम्बाप्पेच्या 10 गोलची बरोबरी होईल. तर एक गोल असिस्ट केल्याने एम्बाप्पेच्या पुढे निघून जाईल.

मेस्सीला पाचवा खेळाडू बनण्याची संधी

फ्रान्सच्या एम्बाप्पेने या वर्ल्डकप स्पर्धेत 10 गोल करून एका यादीत स्थान मिळवलं आहे. अशी कामगिरी करणारा 56 वर्षातील पहिला आणि एकूण चौथा खेळाडू ठरला आहे. आता ही संधी मेस्सीकडेही आहे. अंतिम सामन्यात त्याने दोन गोल मारले तर नक्कीच मेस्सी 10 गोल मारणारा पाचवा खेळाडू ठरू शकतो. जर मेस्सीने ही संधी गमावली तर एम्बाप्पेला गोल्डन बूट मिळेल. असं झालं तर ला लीगा गोल्डन बूट, चॅम्पियन्स लीग गोल्डन बूट आणि फिफा वर्ल्डकप गोल्डन बूट जिंकणारा पहिला खेळाडू ठरेल.

Follow Us
कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
Raj Thackeray Sabha Update : कर्जतमधील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंची आज सभा
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार
एकनाथ शिंदेंवरील टीकेने नरेश म्हस्के आक्रमक; थेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा;
महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचा शरद पवार घेणार आढावा; मुख्यमंत्र्यांशीही चर्चा
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम
अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम, 21 फेऱ्यांनंतर निकाल जवळपास निश्चित
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष